File No 498 A: राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार; ‘फाईल नंबर 498 अ’मध्ये साकारणार भूमिका

कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.

File No 498 A: राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार; 'फाईल नंबर 498 अ'मध्ये साकारणार भूमिका
राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 20, 2022 | 11:38 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘फाईल नंबर – 498 अ’ (File No- 498 A) या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर 498 अ’ या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील- प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. हार्दिक आणि अक्षयानं पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा ‘फाईल नंबर 498 अ’ या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकेत दिसतील.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्यावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिका संपल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते आणि आता दोघांनी साखरपुडाही आटोपलाय. मे महिन्यात अक्षया आणि हार्दिकने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें