शिवजयंतीनिमित्त ‘सेर सिवराज है’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन

उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार 'सेर सिवराज है' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे.

शिवजयंतीनिमित्त 'सेर सिवराज है'गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन
सेर सिवराज है
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:32 PM

मुंबई : रामायण, महाभारतात आजवर अनेक राजांनी आपली भूमिका चोख निभावली. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. अशा महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असे म्हटले की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय (Chtrapati Shivaji Maharaj) दुसरे कुठले नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार (Divya Kumar) ‘सेर सिवराज है’ (Ser Sivraj Hain) या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. हे गाणं सध्या प्रेक्षककांच्या पसंतीस उतरतंय. दिव्य कुमारने हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात त्याने मराठीतील ‘फत्तेशिकस्त’ (fatteshikast), ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat Ghusali) या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला.आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून ‘मानस मराठी’ (Mans Marathi) प्रस्तुत असून संजय पटेल (Sanjay Patel) निर्मित आहे.

“सेर सिवराज है” हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचं दिग्दर्शन ज्ञानेश्वर राजकुले यांनी केलं आहे. गायक दिव्य कुमार ‘सेर सिवराज है’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. हे गाणं सध्या प्रेक्षककांच्या पसंतीस उतरतंय. दिव्य कुमारने हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात त्याने मराठीतील ‘फत्तेशिकस्त’, ‘कट्यार काळजात घुसली’ या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला.आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून ‘मानस मराठी’प्रस्तुत असून संजय पटेल निर्मित आहे.

‘सेर सिवराज है’ हे गाणे सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांनी स्वरबद्ध केले आहे. माझा मल्हार, हे गजानन या गाण्यांचे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शक प्रसाद शिरसाठ यांनी केले असून देव महादेव, तू जोगवा वाढ ही गाणी अद्याप प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या गाण्याचे संगीत संयोजनही प्रसाद शिरसाठ यांनी केले असून गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचा खारीचा वाटा आहे. शिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यात वाटा आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग ‘अपोस्ट्रॉफी स्टुडिओ’ नाशिक, ‘डॉन स्टुडिओ’ पुणे आणि ‘साउंड आयडियाज स्टुडिओ’ मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत.

महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे ‘मानस मराठी’ युट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार असून शिवभक्तांना पर्वणीच ठरणार आहे.

संबंधित बातम्या

शिवजयंतीनिमित्त ‘सेर सिवराज है’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामी गौतमचा ‘थर्स डे मूड’, पाहा टॉप 5 फोटो

Vaishali Bhaisane | माझ्या हत्येचा कट रचलाय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.