AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shalmali Kholgade Wedding | फोटोंचा हटके हार, गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात!

गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) हिने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर असलेल्या फरहान शेखसोबत (Farhan Sheikh) सात फेरे घेतले आहेत. या जोडप्याने त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले होते.

Shalmali Kholgade Wedding | फोटोंचा हटके हार, गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात!
Shalmali-Farhan
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 11:11 AM
Share

मुंबई : गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) हिने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर असलेल्या फरहान शेखसोबत (Farhan Sheikh) सात फेरे घेतले आहेत. या जोडप्याने त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले होते. परंतु, आता 1 डिसेंबर रोजी इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रपरिवारासाठी खास रिसेप्शन आयोजित करण्याची त्यांची योजना आहे. ही जोडी गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती.

नवविवाहित जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने माहिती देताना सांगितले की, ‘शाल्मली आणि फरहान यांना नेहमीच कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अतिशय खाजगी पद्धतीने हा महत्त्वाचा समारंभ करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचा हा खास दिवस अतिशय खाजगी आणि मिनिमलिस्टिक ठेवण्यास प्राधान्य दिले. फक्त नोंदणीकृत विवाह करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, शेवटी त्यांच्या पालकांच्या आनंदासाठी त्यांनी घरच्या घरी काही विधी केले. त्याच दिवशी त्यांनी साखरपुडा देखील केला. या सोहळ्याला अवघ्या 15 जणांची उपस्थिती होती.

हटके वरमाला!

प्रत्येकाने या जोडप्यासोबत त्यांच्या या खास दिवसाचा आनंद साजरा केला. त्यांनी अतिशय साधे पोशाख परिधान केले होते. तर, त्याच्या वरमाला देखील हटके होत्या. यात कागदी फुलांसह चक्क त्यांचे काही फोटो गुंफलेले होते.

कोण आहे शाल्मली खोलगडे?

अद्याप शाल्मलीने याबाबत माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाल्मालीने ‘परेशान’ (इशकजादे), ‘दारू देसी’ (कॉकटेल) आणि ‘बलम पिचकारी’ (ये जवानी है दिवानी) यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रिअॅलिटी शो, ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ यांत परीक्षक पदाची धुराही सांभाळली होती.

मनोरंजन विश्वात लगीनघाई!

शोबिझ जगतातही लग्नसराईचा मोसम मोठ्या प्रमाणावर येऊन धडकत असल्याचे दिसत आहे. मागील काही काळात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत, तर अनेकांची लग्ने येत्या काही दिवसांत आहेत. याची सुरुवात पत्रलेखा आणि राजकुमार राव यांच्या लग्नाने झाली. ही जोडी 15 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकली. आता चाहते बॉलिवूडमधील पॉवर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या येत्या 7 ते 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहोत. यानंतर ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता लोखंडेचा विवाह तिचा प्रियकर विकास (विकी) जैन याच्याशी 14 डिसेंबर रोजी होणार आहे. तर, माध्यम वृत्तानुसार, मौनी रॉय जानेवारीमध्ये सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.