Deeksha Ketkar | अभिनेता शशांक केतकरची बहीण नव्या मालिकेत, मुख्य भूमिकेत!

दीक्षा केतकरची मुख्य भूमिका असलेली 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका सोनी मराठीवर रुजू झाली (Shashank Ketkar Sister Deeksha Ketkar)

Deeksha Ketkar | अभिनेता शशांक केतकरची बहीण नव्या मालिकेत, मुख्य भूमिकेत!
शशांक केतकर आणि दीक्षा केतकर

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातही स्टारकिड्सची संख्या कमी नाही. ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘माझा होशील ना’ मालिकांतून अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण गौतमी देशपांडेच्या रुपाने स्टार सिबलिंगही पाहण्याचा योग आला. आता आणखी एका कलाकाराची बहीण मराठी मालिकासृष्टीत पाऊल ठेवत आहे. छोट्या पडद्यावरचा ‘चॉकलेट हिरो’ अशी ख्याती असलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) ‘पाहिले ना मी तुला’ (Pahile Na Me Tula) मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. शशांकची धाकटी बहीण दीक्षा केतकर (Deeksha Ketkar) आता नव्या मालिकेत झळकणार आहे. (Marathi TV Actor Shashank Ketkar Sister Actress Deeksha Ketkar to appear in Marathi Serial Tu Saubhagyavati Ho)

‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेत मुख्य भूमिका

दीक्षा केतकरची मुख्य भूमिका असलेली ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका कालपासूनच सोनी मराठी वाहिनीवर रुजू झाली आहे. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडे, दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. या मालिकेच्या प्रोमोंनीच लक्ष वेधून घेतलं होतं.

बोलके डोळे आणि निरागस हास्य असलेली ही अभिनेत्री दीक्षा केतकर आहे. ती ऐश्वर्याची भूमिका साकारत आहे. किशोरवयीन ऐश्वर्याचं तीन मुलांचा बाप असलेल्या गृहस्थाशी कसं लग्न ठरतं, ऐश्वर्या जाधव घराण्याची सून म्हणून शोभून दिसते का, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांक विरुद्ध दीक्षा

विशेष म्हणजे सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे. पण त्यामुळे दीक्षाची थेट शशांकदादासोबत स्पर्धा होणार आहे. कारण याच वेळी झी मराठीवर ‘पाहिले ना मी तुला’ ही मालिका लागते. त्यामुळे एकाच घरात दोन वाहिन्यांवरील प्रतिस्पर्धी अशी हेल्दी कॉम्पिटिशन रंगणार आहे. (Shashank Ketkar Sister Deeksha Ketkar )

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

दीक्षा केतकरने बालकलाकार म्हणून काही नाटकांमध्ये काम केलं आहे. या भूमिकांसाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. तिने न्यूयॉर्कला जाऊन अभिनयाचे रितसर प्रशिक्षणही घेतले आहे. धूसर या मराठी सिनेमातही तिने काम केलं आहे.

संबंधित बातम्या :

शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस, इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

(Marathi TV Actor Shashank Ketkar Sister Actress Deeksha Ketkar to appear in Marathi Serial Tu Saubhagyavati Ho)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI