Michael Jackson Death Anniversary : तुम्हाला माहित आहेत का पॉपस्टार मायकलच्या जीवनाशी संबंधित ‘ही’ 10 मनोरंजक तथ्ये?

जरी मायकल जॅक्सन (Michael Jackson) आज या जगात, आपल्यात नसला, तरी त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. त्याच्या कारकीर्दीमुळे तो अमर झाला आहे. पिढ्यान् पिढ्या त्याचे स्मरण होताच राहील. 1964 मध्ये तो आपल्या कुटूंबाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला होता.

Michael Jackson Death Anniversary : तुम्हाला माहित आहेत का पॉपस्टार मायकलच्या जीवनाशी संबंधित ‘ही’ 10 मनोरंजक तथ्ये?
मायकल जॅक्सन
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 11:18 AM

मुंबई : जरी मायकल जॅक्सन (Michael Jackson) आज या जगात, आपल्यात नसला, तरी त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. त्याच्या कारकीर्दीमुळे तो अमर झाला आहे. पिढ्यान् पिढ्या त्याचे स्मरण होताच राहील. 1964 मध्ये तो आपल्या कुटूंबाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला होता. जॅक्सन फाईव्ह असे या ग्रुपचे नाव होते. पण, जेव्हा मायकल जॅक्सनचा एरा आला, तेव्हा त्याने सर्वांना मागे सोडले. आज (25 जून) त्याची पुण्यतिथी आहे. तर, आज या खास प्रसंगी त्याचे स्मरण करून आपण त्याच्या जीवनाशी संबंधित काही उत्तम रंजक गोष्टी जाणून घेऊया…(Michael Jackson Death Anniversary know some interesting facts about pop star)

मायकल जॅक्सनच्या आयुष्यासंबंधित काही तथ्ये :

1) मायकल जॅक्सन पहिल्यांदाच शिवसेनेच्या निमंत्रणावर मुंबईत आला होता. जिथे विमानतळावर त्याचे अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने त्याचे स्वागत केले होते. त्या काळात बॉलिवूडमधीलच नव्हे तर दक्षिणच्या इंडस्ट्रीतील अनेक बडे कलाकार त्याला भेटायला आले होते.

2) मायकेल जॅक्सनचा अल्बम ‘थ्रिलर’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम आहे.

3) मायकल जॅक्सन आणि वादांचे नाते तसे चर्चित होते. लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांचा त्याने अनेक वेळा सामना केला होता. 2002मध्ये मुलाला बाल्कनीच्या बाहेर लटकवल्यामुळे अभिनेता चर्चेत आला होता. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तो दोन दिवस तुरूंगातही होता.

4) मायकल जॅक्सन जिवंत राहण्यासाठी देखील ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचा. त्याचा असा विश्वास होता की, असे केल्याने आपले शरीर चांगले आयुष्य जगते आणि आपण अधिक आयुष्य जगू शकतो.

5) एचआयव्ही / एड्सच्या विविध रुग्णांना मदत करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे जॅक्सन यांना माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी मानवतावादी पुरस्कार जाहीर केला.

6) मार्च 2009मध्ये, मायकेल जॅक्सन म्हणाला होता की, “दिस इज इट” हीच माझी शेवटची मैफल असेल. मायकल या नंतर कोणतीही मैफिली करणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम होण्यापूर्वीच 25 जून, 2009 रोजी मायकलला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले.

7) मायकल जॅक्सन याच्या निधनानंतर इंटरनेट क्रॅश झाले होते. पॉप स्टारच्या मृत्यूची बातमी दुपारी 3:15 वाजता आली. ज्यानंतर विकिपीडिया, एओएल आणि ट्विटर एकत्र क्रॅश झाले होते.

8) मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दोनदा पोस्टमार्टमसाठी पाठविला गेला. कारण मायकलची हत्या झाल्याची कुटुंबीयांनी शंका होती.

9) असे म्हणतात की, मायकलच्या पोस्टमॉर्टम अहवालात असे सांगितले गेले होते की, त्याच्या शरीरावर सुईचे बरेच डाग आहेत. मृत्यूच्या काही तासांपूर्वीच त्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्स घेतले होते.

10) मायकेल जॅक्सनची अंत्य यात्रा सर्वत्र लाईव्ह दाखवली गेली, ज्यास सुमारे अडीच अब्ज लोकांनी पाहिले होते. हे आतापर्यंतचे सर्वाधिक पाहिले गेलेले थेट प्रक्षेपण होते.

(Michael Jackson Death Anniversary know some interesting facts about pop star)

हेही वाचा :

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा कातिलाना अंदाज, टॉपलेस फोटो शेअर!

मॅटाडोर, गन आणि फिरते रेस्टॉरंट, असा चित्रित झाला ‘नसीब’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन!

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.