AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirzapur The Movie Teaser: मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजीत थरार; आता लढाई सिंहासनासाठी नाही तर..

Mirzapur The Movie Teaser: 'मिर्झापूर' या वेब सीरिजच्या प्रचंड यशानंतर आता त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिर्झापूर द मूव्ही'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यात तेवढीच थरारक कथा पहायला मिळतेय.

Mirzapur The Movie Teaser: मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजीत थरार; आता लढाई सिंहासनासाठी नाही तर..
Mirzapur The Movie TeaserImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2026 | 1:36 PM
Share

मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा गादीसाठी कालीन भैया-गुड्डू आणि मुन्ना भैया यांच्यात रक्तरंजित थरार पहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेर तो क्षण आला आहे. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या तुफान यशानंतर आता निर्मात्यांनी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या टीझरवरून हे स्पष्ट झालं आहे की, यावेळी खेळ फक्त मिर्झापूरच्या सिंहासनावर बसण्याचा नाही, तर स्वत:चं साम्राज्य उभारण्याचा आहे. ‘मिर्झापूर : द मूव्ही’च्या कथानकात पुढे काय नवीन घडणार, याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होता. प्रेक्षकांच्या काही प्रश्नांची उत्तरं या टीझरमधून मिळतील. कारण निर्मात्यांनी यात फक्त नवीन पात्रेच सादर केली नाहीत, तर डायलॉग्सपासून कथेपर्यंत अनेक बारकावे यात पहायला मिळतात.

2 मिनिट 22 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात कालीन भैयापासून होते. “काबिल औलाद बहुत मुश्किल से मिलती है और कभी कभी नहीं भी मिलती”, असं तो पूजा करताना म्हणतो. त्यानंतर गुड्डू भैयाची धमाकेदार एण्ट्री होते. “आप हिस्ट्री उठाकर देख लो, जितने भी एम्बीशियस गँगस्टर रहे हैं, सब टॉप पर पहुंचे हैं,” असं तो त्याच्या वडिलांना म्हणतो. त्यानंतर मुन्ना भैया त्याच्याच जबरदस्त अंदाजाच डायलॉग म्हणत उत्सुकता आणखी वाढवतो. कालीन भैया-गुड्डू भैया आणि मुन्ना भैया या टीझरमधअये मिर्झापूरच्या त्याच जुन्या विश्वाची सफर घडवून आणतात.

पहा टीझर-

2018 मध्ये पहिल्या सिझनपासून सुरू झालेली ही कथा आता मोठ्या पडद्यावर एका पूर्णपणे नवीन कथेसह पुढे जाते. मात्र यातील खरा सरप्राइज हा ‘पंचायत’ फेम सचिव ठरतो. ‘मिर्झापूर : द मूव्ही’मध्ये फक्त मुन्नाच परतला नाही, तर गुड्डूचा छोटा भाऊ बबलू पंडितनेही कमबॅक केला आहे. सीरिजमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने ही भूमिका साकारली होती. मात्र आता चित्रपटात ही भूमिका ‘पंचायत’ फेम अभिनेता जितेंद्र कुमार साकारत आहे. यावेळी तो या दृढनिश्चयाने परतला आहे की, तो आणि गुड्डू भैया मिळून कालीन भैयाचं साम्राज्य चालवणार नाहीत, तर त्यांना स्वत:चं वेगळं साम्राज्य उभं करायचं आहे. याशिवाय भोजपुरी स्टार रवी किशनसुद्धा या चित्रपटात एका पूर्णपणे नवीन आणि जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे.

‘मिर्झापूर द मूव्ही’चं दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलं आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, जितेंद्र कुमार आणि रवी किशन यांच्यासह श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तेलंग, प्रमोद पाठक, श्रिय पिळगांवकर, हर्षिता शेखर यांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक