AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप

Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. या हॉटेलच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर... रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
Rupali Chakankar and Rupali PatilImage Credit source: Google
| Updated on: Aug 26, 2026 | 7:34 PM
Share

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. हे एक बार आणि रेस्टॉरंट आहे. या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र आता या हॉटेलच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फक्त रेस्टॉरंट नाही…

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या रेस्टॉरंट व्यवसायावर बोलताना म्हटले की, रूपाली चाकणकर यांनी रेस्टॉरंट व्यवसायात पदार्पण केलं आहे याची अडचण नाही. पण ते नुसतं बार रेस्टॉरंट नाही, तर तो पब, हुक्का पार्लर, डान्सबार आहे. हा 50-60 कोटींचा डोलारा उभा केला, कुठून आले एवढे पैसे? हे पैसे त्या पतसंस्थेतले तर नाहीत ना? त्या भोंदू बाबा खरात प्रकरणातील तर नाहीत ना? त्यांनी उद्योग धंद्याला लागताना, कायदेशीर उद्योग धंद्याला लागावं.

पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, ‘हा पब बार 20 हजार स्क्वेअर फुटांचा आहे. खरात बाबाला 200 कॉल झाले आहेत, म्हणून यांना अटक करा अशी मागणी केली. चाकणकर त्या संस्थेवर आहेत म्हणून अटक करा अशी मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली नाही, पण रूपाली चाकणकरांना जाब विचारला म्हणून तिला लज्जा उत्पन्न झाली म्हणून तिची तक्रार वीस मिनिटात घेतली. सत्ताधाऱ्यातील काही नेते तिच्या आणि पोलिसांसोबत साटलोट करून आहेत.

व्यवसायासाठी पैसा कुठून आणला?

रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘त्यांनी या व्यवसायासाठी पैसा कुठून आणला? हुक्का, बारला परवानगी कोणी दिली? हे बघितलं पाहिजे. आता त्या म्हणतील माझ्या मुलाच्या नावावर व्यवसाय आहे. तुमचा मुलगा कुठे काम करत होता? तुमचा नवरा कुठे काम करत होता? की तुम्ही कुठे काम करत होता? हे तुम्हाला जनतेला सांगावं लागेल असं म्हणत रूपाली चाकणकर यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी’ अशी मागणीही करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांच्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती. यावर बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, ‘जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना खरातला त्यांनी पाणी दिलेलं आहे. त्यामुळे ते रूपाली चाकणकर सोबत खरातचे लाभार्थी आहेत. सुनील शेळके तिथे होते म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट त्याठिकाणी असू शकेल.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक