जेव्हा आमिर खान अन् अनिल कपूर सोबत काम केलेली ही अभिनेत्री रस्त्यावर भीक मागताना दिसली; रस्त्यावरचे खाणेरडे अन्न खाल्ल्याने झाला मृत्यू
अनेकदा कलाकारांचे आयुष्य चढउतारांनी भरलेलं असतं. अशीच एक अभिनेत्री होती एका चित्रपटामुळे तिचं आयुष्य बदललं. तिचा मृत्यूही वाईट पद्धतीने झाल्याचं म्हटलं जातं. चित्रपटांमधून तिला ओळखं मिळाली. मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं. मात्र तरीसुद्धा तिचा शेवट हा अतिशय दुर्दैवी झाला.

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांची सुरुवात कशी झाली याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. पण मिळालेले स्टार्डम पूर्ण काळ टीकेल असं काही नाही. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगातही असेच घडले. कारण अनेक स्टार्स स्वप्ने पाहतात पण दुर्दैवाने, काहींना यश मिळाले तर काहींना नाही.
अभिनेत्रीचा मृत्यू फार वाईट पद्धतीने झाला
बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात नेहमी असेच घडताना दिसले आहे. अशीच एक अभिनेत्री होती जिचे आयुष्य इतकं खडतर झालं होतं की तिच्याकडे खायलाही पैसे नव्हते. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिस मिनी रस्त्यावर भीक मागत असे. पण एका दिग्दर्शकामुळे तिचं आयुष्यच बदललं,शेवटी तिचा मृत्यूही फार वाईट पद्धतीने झाला. एवढंच नाही तर या अभिनेत्रीने आमिर खान, अजय देवगण, अनिल कपूर अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मिस मिनी होती. जरी तुम्ही तिला नावाने ओळखत नसाल तरी तुम्ही तिला चित्रपटांमध्ये पाहिलं असेल.
रस्त्यावर भीक मागत असे.
अनेक चित्रपटांमध्ये मिस मिनीला कॉमेडी भूमिकेतच पाहायल मिळालं. मिस मिनीच्या बाबतीत असेच घडले, तिला कॉमेडी भूमिका मिळाल्या त्या तिच्या लूक आणि वजनामुळे. 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिस मिनी रस्त्यावर भीक मागत असे. ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे. मिस मिनी नेहमीप्रमाणे सिग्नलवर भीक मागत होती. एके दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शक इंदर कुमार यांनी मिनीला रस्त्यावर पाहिले. इंदर कुमार त्यांच्या ‘दिल’ चित्रपटाची तयारी करत होते.
- Miss Minnie
रस्त्यावर भीक मागणारी एक मुलगी रातोरात स्टार झाली
दरम्यान, त्यांना मिनीमध्ये एक अभिनेत्री सापडली. ती सुंदर नसली तरी तिच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली तरी कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य येऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मिनीला चित्रपटात एका विनोदी भूमिकेसाठी घेतलं. त्यांनी मिनीला अभिनयाचे प्रशिक्षणही दिलं. तिने तिच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा केली. त्यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी, इंदर कुमार यांनी मिनीची निवड केली आणि तिला ‘दिल’ चित्रपटात कास्ट केलं आणि रस्त्यावर भीक मागणारी एक मुलगी रातोरात स्टार झाली.
आमिर, माधुरी आणि अनिल कपूर अशा अनेक स्टार्ससोबत काम केलेलं
मिस मिनीने ‘दिल’ चित्रपटात काम केले. ‘दिल’ चित्रपटातील एक दृश्य आठवत असेल जेव्हा माधुरी दीक्षित आमिर खानला बॉक्सिंग सामन्याचे आव्हान देते, ज्यामध्ये ती म्हणते की जिंकणारा तिला किस करेल आणि हरणाऱ्याला (आदि इराणी) मिस मिनी चुंबन घेईल. या दृश्यामुळे तिला मिस मिनी हे टोपणनाव मिळाले.
या चित्रपटानंतर इंदर कुमारने तिला आणखी दोन चित्रपटांमध्ये कास्ट केले. बेटा आणि राजा. मिस मिनी या दोन्ही चित्रपटांमध्येही दिसली. तिचे वाढलेले वजन तिचे वैशिष्ट्य बनले. हळूहळू, तिला तिच्या विनोदातून बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली. ती दिलजले, बेटा आणि मेला यासह अनेक चित्रपटांमध्येही दिसली.
रस्त्यावरचे घाणेरडे अन्न खाल्ल्यामुळे तिची प्रकृती बिघडली
असे म्हटले जाते की मिस मिनी मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही ती बरी होऊ शकली नाही. यानंतर मिनीने एका ट्रक ड्रायव्हरशी लग्न केले. यानंतर तिच्या नशिबाने वळण घेतले. अन् मिस मिनी पुन्हा रस्त्यावर भीक मागू लागली. असे म्हटले जाते की रस्त्यावरचे घाणेरडे अन्न खाल्ल्यामुळे तिची प्रकृती बिघडली झाली आणि नंतर 2000 मध्ये तिचा मृत्यू झाला. पण असेही म्हटले जाते की मिस मिनीला एका कारने चिरडले आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. परंतु मिस मिनी बॉलिवूडमध्ये आली आणि स्वतःसाठी एक छोटेसे नाव कमावल्यानंतर निघून गेली. आजही तिची ओळख जुन्या चित्रपटांमधून जीवंत आहे.
