Mission Raniganj Review | खुर्चीला खिळवून ठेवणारा अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 1998 मध्ये पश्चिम बंगालच्या रानीगंजमधील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेनं संपूर्ण देश हादरलं होतं. तेव्हा इंजीनिअर जसवंत सिंह गिल यांनी अथक प्रयत्न करून 65 जणांचा जीव वाचवला होता.

Mission Raniganj Review | खुर्चीला खिळवून ठेवणारा अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज'; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Mission RaniganjImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 11:38 AM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट आज (6 ऑक्टोबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये अक्षयने रियल लाइफ हिरो जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जमिनीपासून जवळपास 350 फूट खाली अडकलेल्या 65 खाण कामगारांचा जीव वाचवला होता.

2006 मध्ये हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये नवे तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही 50 फूट खाली बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्स या मुलाला वाचवण्याचं अभियान जवळपास तीन दिवस चाललं होतं. या घटनेच्या तब्बल 18 वर्षांपूर्वी 1989 मध्ये जसवंत सिंह गिल यांनी अवघ्या दोन दिवसांत जमिनीपासून 300 फूट खाली अडकलेल्या 65 कामगारांचा जीव वाचवला होता. ‘कॅप्सूल मॅन’ जसवंत सिंह यांच्या भूमिकेतून अक्षय कुमारने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेचा नवीन पैलू प्रेक्षकांसमोर आणला आहे. सुरुवातीच्या क्षणापासून ते क्लायमॅक्सपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.

जवळपास 250 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश तंत्रज्ञानाच्या मूलभूत पद्धती आजसुद्धा जगभराच्या कोळसा खाणीमध्ये वापरल्या जातात. भारतात पहिली कोळसा खाण रानीगंजमध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. अर्थातच भारतातील संपूर्ण कोळसा व्यवसाय हा इंग्रजांनी बनवलेल्या व्यवस्थेवरच आधारित होता. इंग्लंड आणि भारतच्या खाणी एकमेकांपासून जरी सहा हजार किलोमीटर दूर अंतरावर असल्या तरी एक गोष्ट या दोन्ही कोळसा खाणींमध्ये समान होती. ती म्हणजे खाणींमध्ये होणारी दुर्घटना.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाची कथा

जसवंत सिंह गिल (अक्षय कुमार) त्यांच्या गरोदर पत्नीसोबत (परिणीती चोप्रा) रानीगंजमध्ये राहायला येतात. पश्चिम बंगालच्या रानीगंजमध्ये जसवंत हे कोल इंडिया लिमिटेडमध्ये रेस्क्यू इंजीनिअर म्हणून काम करत असतात. जेव्हा कोळसा खाणीत झालेल्या ब्लास्टनंतर त्यात पाणी भरू लागतं, तेव्हा जमिनीखाली अडकलेल्या 71 लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी जसवंत आपल्या खांद्यावर घेतात. मात्र हे मिशन सुरू होण्यापूर्वीच सहा कामगारांचा जीव जातो. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बऱ्याच अडथळ्यांना पार करून जसवंत सिंह गिल मिशन पूर्ण करतात. परंतु हे संपूर्ण मिशन कशा पद्धतीने पूर्ण केलं जातं, त्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते.

दिग्दर्शन

‘मिशन रानीगंज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन टिनू देसाई यांनी केलं आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलं होतं. ‘रुस्तम’नंतर टिनू आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. जवळपास गेल्या सात वर्षांमध्ये टिनू यांच्या दिग्दर्शनात बरेच बदल झाले आणि तेच बदल या चित्रपटात पाहायला मिळतात. या चित्रपटाची संकल्पना जसवंत गिल यांची मुलगी पूनम गिल यांची असून स्क्रीनप्ले विपुल के रावत यांनी लिहिला आहे.

‘मिशन रानीगंज’च्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील बारकाईने दाखवलेल्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करतात. यामध्ये 80 चा दशक उत्तमरित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेव्हाचा माहौल, लोकांचे कपडे आणि त्यांची भाषा यांवर बारकाईने लक्ष दिलं गेलंय. रेस्क्यू मिशनदरम्यान एखाद्या माहितीपटाप्रमाणे या चित्रपटाची कथा जलदगतीने पुढे जात नाही. त्यामुळे यातील दृश्ये कधी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी तुमच्या डोळ्यात पाणी. या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट माहीत असतानाही तुम्ही त्याच्या कथेशी जोडून राहता आणि हेच दिग्दर्शकांचं मोठं यश आहे.

कलाकारांचं अभिनय

चित्रपटात अक्षय कुमारने जसवंत सिंह गिल यांची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’मधील परफॉर्मन्सपेक्षा ‘मिशन रानीगंज’मधील त्याचा अभिनय अधिक लक्षवेधी ठरतो. या चित्रपटात एका बाजूला जसवंत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी आहे. अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणारी परिणीती चोप्रा यामध्ये अत्यंत सकारात्मक दिसून येते. मात्र चित्रपटात तिच्या भूमिकेला फारसा वाव नाही. या दोघांशिवाय वरूण बडौला, कुमुद मिश्रा, रवी किशन, पवन मल्होत्रा आणि दिव्येंदू भट्टाचार्य या कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.

चित्रपटाच्या कथेला अधिक रंजक बनवण्यात एडिटिंगचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोळसा खाणीची डिटेलिंग, अंधारात केलेली लायटिंग आणि कृत्रिम खाण बनवून केलेली शूटिंग यासाठी सिनेमॅटोग्राफर असिम मिश्रा यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. यामधील गाणी काही खास नाहीत. मात्र बॅकग्राऊंड म्युझिक कमालीचा आहे. या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रत्येक सीन अधिक रंजक बनतो.

आपल्या आजपास सुपरहिरो शोधणाऱ्यांसाठी या चित्रपटातून हीच शिकवण मिळते की, तुमच्या कहाणीचे हिरो हे तुम्ही स्वतः असता. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आव्हानाचा सामना हिंमतीने करावा लागेल. प्रत्येक व्यक्तीच्या आत जसवंत सिंह गिला असतो, जो योग्य विचार आणि हिंमत यांच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकतो, हे यातून शिकायला मिळतं.

मिशन रानीगंजला चार स्टार

Non Stop LIVE Update
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा...
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा....
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?.
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार.
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण.
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर.
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.