निधनाच्या चार वर्षानंतर ओम पुरी यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार!
मुंबई : प्रसिध्द अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाला चार वर्षे झाली आहेत. ओम पुरी यांनी आपल्या अभिनयामधून छाप निर्माण करून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. निधनानंतरही ओम पुरी चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहेत. ओम पुरी यांच्या निधनाला चार वर्षपूर्ण झाल्यानंतर त्यांचा ‘ओमप्रकाश झिंदाबाद’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे नाव अगोदर ‘रामभजन जिंदाबाद’ होते, […]

मुंबई : प्रसिध्द अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाला चार वर्षे झाली आहेत. ओम पुरी यांनी आपल्या अभिनयामधून छाप निर्माण करून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. निधनानंतरही ओम पुरी चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहेत. ओम पुरी यांच्या निधनाला चार वर्षपूर्ण झाल्यानंतर त्यांचा ‘ओमप्रकाश झिंदाबाद’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे नाव अगोदर ‘रामभजन जिंदाबाद’ होते, नंतर ते ‘ओमप्रकाश जिंदाबाद’ असे बदलून ठेवण्यात आले आहे. (Movie ‘Omprakash Zindabad’ is all set to release)
या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, झाकीर हुसैन आणि दिवंगत अभिनेते जगदीप देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ऑनलाईन माध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते खालिद किदवई म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाचे काही मुद्दे असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब झाला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेतला होता. चित्रपटात काम केलेले दोन सदस्य आता जगात नाहीत.
चित्रपट पूर्ण होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाविषयी अनेक मुद्दे होते आणि त्यानंतर ओम पुरी यांचे निधन झाले. शेवटी, जेव्हा या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली तेव्हा कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यामुळे चित्रपटाला पुढे ढकलण्यात आले होते. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. ते पुढे म्हणाले की, या चित्रपटासाठी मी परानोमा स्टूडियोचा आभारी आहे. दिवंगत अभिनेता ओम पुरी यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने हा चित्रपट त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे. ‘ओमप्रकाश जिंदाबाद’ हे नाव त्यांना समर्पित केले आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल तसेच जगदीप यांनाही श्रद्धांजली कारण त्यांचाही हा शेवटचा चित्रपट आहे.
स्वतःच्या मृत्यूबाबत केलेली भविष्यवाणी
ओम पुरी यांनी एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या मृत्यूविषयी भाकीत केले होते. ते म्हणलेले की, ‘माझा मृत्यू अचानक होईल. मी झोपायला जाईन आणि माझा मृत्यू झालेला कुणालाही कळणार नाही. माध्यमांत माझ्या मृत्यूची बातमी येईल, तेव्हा सगळ्यांना कळेल’. त्यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले. 6 जानेवारी 2017 राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. हृदयविकारच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले होते.
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडेंच्या नवऱ्याला आणि सुजय विखेंच्या पत्नीला कोण फोडतंय?
बॉलिवूड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतदेह मिळाला
(Movie ‘Omprakash Zindabad’ is all set to release)
