मालिकेच्या शूटिंगनिमित्त गुजरातवारी, मराठी अभिनेत्याला कोरोना संसर्ग

'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने कोरोना पॉझिटिव्ह आहेत (Mulgi Zali Ho Actor Kiran Mane Corona)

मालिकेच्या शूटिंगनिमित्त गुजरातवारी, मराठी अभिनेत्याला कोरोना संसर्ग
मुलगी झाली हो मालिकेतील कलाकार
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 3:04 PM

मुंबई : मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत ते मध्यवर्ती भूमिका साकारतात. लॉकडाऊन काळात शूटिंगच्या निमित्ताने मालिकेचे सर्व कलाकार गुजरातला गेले आहेत. तिथेच त्यांना कोरोना संसर्ग झाला. (Mulgi Zali Ho fame Marathi Actor Kiran Mane tested Corona Positive)

किरण माने यांची फेसबुक पोस्ट

“अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. सातार्‍यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहूद्यात सोबत.. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो ! एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल” अशी फेसबुक पोस्ट किरण माने यांनी केली आहे. यावर मानेंचे सहकारी, मित्र आणि चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

…अनपेक्षीतपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. सातार्‍यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासुन काळजी…

Posted by Kiran Mane on Friday, 30 April 2021

कोण आहेत किरण माने?

अभिनेते किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही खलनायकी भूमिका साकारतात. मालिकेत त्यांचा दुष्ट बाप ते प्रेमळ पिता असा प्रवास उलगडताना दिसत आहे. याआधी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका, माझ्या मित्राची गर्लफ्रेण्ड, स्वराज्य हे मराठी चित्रपट, तर प्रकाश झा दिग्दर्शित अपहरण या हिंदी चित्रपटात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मालिकांचं चित्रिकरण राज्याबाहेर

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर मालिकांच्या चित्रिकरणावर गदा आली. त्यानंतर बहुतांश मालिकांचं चित्रिकरण राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं शूटिंग आधी साताऱ्यात केलं जात असे. मात्र सध्या कलाकार आणि तंत्रज्ञ गुजरातमध्ये शूटिंग करत आहेत. मालिकेत सविता मालपेकर, शर्वाणी पिल्ले यासारखे दिग्गज कलाकारही आहेत. गेल्या आठवड्यापासून मालिकेचे नवे भागही प्रक्षेपित झाले. त्यातच किरण मानेंना कोरोना संसर्गाने गाठल्याने ते महाराष्ट्रात परतले आहेत. आता मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखेशी निगडित ट्रॅक बदलला जाण्याची शक्यता आहे. (Mulgi Zali Ho fame Marathi Actor Kiran Mane tested Corona Positive)

किरण मानेंची व्हायरल पोस्ट

“तुम्ही खबरदारी घ्या… मी जबाबदारी घेतो !” हे वाक्य तू ‘आतून’ – मनाच्या तळातून – उद्गारलंस… आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळलं.. तू फक्त दिलासा दे.. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत !” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करणारी पोस्ट किरण मानेंनी काही दिवसांपूर्वी लिहिली होती.

संबंधित बातम्या :

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो, अभिनेता किरण मानेंच्या जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!

‘नाव सुचत नव्हतं, इतक्यात त्यांनी दरवाजा ठोठावला..’, वाचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’चा किस्सा…

(Mulgi Zali Ho fame Marathi Actor Kiran Mane tested Corona Positive)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.