AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम गोपाल वर्मांची सुटका नाही? न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट

राम गोपाल वर्मा हे कायम चर्चेत असतात. नुकताच न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...

राम गोपाल वर्मांची सुटका नाही? न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
Ram Gopal VarmaImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 06, 2025 | 4:29 PM
Share

दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना चेक बाऊन्स प्रकरणी मुंबई न्यायालयाकडून झटका बसला आहे. न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांची तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्याची विनंती फेटाळली आणि राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. यापूर्वी 21 जानेवारी रोजी राम गोपाल वर्मा यांना न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना दंडही ठोठावला होता.

अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांनी जानेवारीमध्ये राम गोपाल यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 3 लाख 72 हजार 219 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी कोर्टात धाव घेत आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी राम गोपाल वर्मा यांची याचिका 4 मार्च रोजी फेटाळून लावलवी. कारण ते न्यायालयात हजर झाले नाहीत. वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी या प्रकरणाची सुनावणी 28 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, न्यायालयात हजर राहिल्यानंतर आरोपीला जामिनासाठी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

2018 मध्ये एका कंपनीने राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार कंपनीच्या वतीने वकील राजेश कुमार पटेल यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून राम गोपाल वर्मा यांना हार्ड डिस्क पुरवत होती. वाचा: तू नीच, गलिच्छ माणूस आहेस; रोहित शर्माला वजनावरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तरांचे चोख उत्तर

कंपनीने फेब्रुवारी 2018 ते मार्च 2018 या कालावधीत राम गोपाल वर्मा यांच्या फर्मला हार्ड डिस्क पुरवल्या होत्या. त्यासाठी त्यांना 2 लाख 38 हजार 220 रुपये द्यावे लागणार होते. या प्रकरणात, 1 जून 2018 रोजी आरोपी म्हणजेच राम गोपाल वर्मा यांनी चेक दिला होता. परंतु तो चेक बाऊन्स झाला. राम गोपाल वर्मा यांच्या फर्मला या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्यांनी पुन्हा एक चेक दिला, मात्र तो स्वीकारण्यात आला नाही. यानंतर कंपनीच्या वतीने राम गोपाल वर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.