अभिनेता मुंबईत येणार समजताच सापळा रचत पोलिसांची कारवाई , हाय-प्रोफाइल प्रकरणातील मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
सध्या अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तो गेल्या कित्येक दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी अभिनेत्याला गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतलं आहे. अभिनेता दिल्लीहून मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी मोठी कारवाई केली.

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याल मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. काशिमीरा पोलिसांनी मोठा सापळा रचत अभिनेत्याला अटक केली असून. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं नाव आहे. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली होती की, रोहुल्लाह मेहदी दिल्लीहून मुंबईला येणार आहे. तेव्हा पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला आणि तो विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं… तर त्याचा ड्रग्स नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे.
तर पोलीस इतर पैलूंचा देखील तपास करत आहेत. ड्रग्स नेटवर्कमधील इतर आरोपी, ड्रग्स पुरवठादार आणि हाय – प्रोफाईल प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. ही पहिली वेळ नाही, जेव्हा पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटींना अटक केली आहे. याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी ड्रग्स प्रकरणात तुरुंगवास भोगला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक चौकशी करत आहेत.
मोठ्या ड्रग्स प्रकरणाचा भांडा फोड करण्यासाठी मेहदी याला झालेली अटक, ही महत्त्वाची कारवाई समजली जात आहे. संबंधिक कारवाई झोन 1 राहुल चौहान याच्या मार्गर्शनाखाली सुरु आहे. या प्रकरणाचा कसून तपास काशिनिरा पोलीस करत आहेत. याआधी देखील आमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी 5 मोठ्या कारवाया केल्या होत्या.
नवी मुंबई पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत पाच मोठ्या धाडी टाकून अमली पदार्थांविरोधात कारवाया केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी अनेक अमेरिकन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्या कॅन्टीन आणि अड्ड्यांवर कारवाई करून कोकेन आणि एमडीचा साठा उद्ध्वस्त केला आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, अफ्रिकन नागरिक मुंबई, नवी मुंबईत व्यापार, वैद्यकीय उपचार नाहीतर शिक्षणासाठी येत असतात. त्यानंतर यामधील अनेक मुलं अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
