प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, 47 व्या वर्षी अखेरचा श्वास

देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हार्ट अटॅकने निधन

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, 47 व्या वर्षी अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 8:18 AM

पुणे : भावपूर्ण गाण्यांपासून ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत. (Music Director Narendra Bhide passed away)

नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी (10 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 9.30 वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

भावपूर्ण संगीत देणारा अवलिया

पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल यासारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे यांनी केले होते. चि व चि सौ का या रोमँटिक कॉमेडी पठडीतील चित्रपटात त्यांनी दिलेली सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुजली आहेत. याशिवाय हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले.

अभिनयातही चुणूक

लव्हबर्डस् या थ्रिलर मराठी नाटकाचे पार्श्वसंगीतही नरेंद्र भिडे यांनी दिले होते. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते.

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.

संबंधित बातम्या :

…आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावाची नोंद झाली!

(Music Director Narendra Bhide passed away)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.