तीन अंड्यांचं बिल तब्बल 1672 रुपये, आणखी एका बॉलिवूडकराला फाईव्ह स्टार हॉटेलचा दणका

अभिनेता राहुल बोस याला काहीमहिन्यांपूर्वीच एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी 442 रुपयांचे बिल भरावे लागले होते. अशीच घटना पुन्हा एकदा बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार शेखर रवजियानी (shekhar ravjiani five star hotel egg bill) यांच्यासोबत घडली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:14 PM, 15 Nov 2019
तीन अंड्यांचं बिल तब्बल 1672 रुपये, आणखी एका बॉलिवूडकराला फाईव्ह स्टार हॉटेलचा दणका

अहमदाबाद : अभिनेता राहुल बोस याला काहीमहिन्यांपूर्वीच एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी 442 रुपयांचे बिल भरावे लागले होते. अशीच घटना पुन्हा एकदा बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार शेखर रवजियानी (shekhar ravjiani five star hotel egg bill) यांच्यासोबत घडली आहे. शेखर यांना तीन अंड्यांसाठी तब्बल एक हजार 672 रुपये बिल भरावे लागले आहे. अहमदाबादमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (shekhar ravjiani five star hotel egg bill) ही घटना घडली.

शेखर यांनी काल (14 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवर या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी बिलाचा फोटोही पोस्ट केला आहे.  “तीन अंड्यांची किंमत एक हजार 672 रुपये आहे. हे एक Eggxorbitant meal होते”, असं त्यांनी ट्वीट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शेखर यांच्या पोस्टमुळे काही युजर्सकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तर काहींनी त्यांना रस्त्यावरील दुकानात अंडी खाण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय काही युजर्संनी मोठ्या हॉटेलच्या खाण्याच्या पदार्थांच्या किंमतीवर आक्षेप घेतला आहे.

शेखर लोकप्रिय संगीतकार विशाल-शेखर या जोडीचा एक भाग आहेत. शेखर यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार मे कभी-कभी’ या चित्रपटातून म्यूझिक कम्पोजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी ब्लफमास्टर, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर, सुलतानसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी म्युझिक कम्पोज केले आहे.

शेखर केवळ चांगले म्युझिक कम्पोजर नसून एक चांगले गायकही आहेत. याशिवाय शेखर यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. सोनम कपूरच्या ‘निरजा’ चित्रपटात शेखर यांनी अभिनय केला होता.