दीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची शक्यता

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये आज (26 सप्टेंबर) महत्वाच्या घडामोडी होणार आहेत (NCB probe to Deepika Padukone).

दीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची शक्यता

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये आज (26 सप्टेंबर) महत्वाच्या घडामोडी होणार आहेत (NCB probe to Deepika Padukone). कारण आज सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज संदर्भात सुरु असलेल्या तपासात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघीही चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र या तिघांकडून संभावित खालील प्रश्न एनसीबी तर्फे विचारण्यात येणार असल्याची शक्यता आहे (NCB probe to Deepika Padukone).

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींची नावं समोर आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. काल (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रितची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे. आज या तीन अभिनेत्रींची चौकशी होणार आहे.

दीपिकाला काय प्रश्न विचारले जाणार?

1) करिश्मा प्रकाशची चॅट केलं होतं का?
2) तुम्ही ड्रग्ज घेता का?
3) करिश्माकडून ड्रग्ज मागवले होते?
4) कोको बारमध्ये कोण कोण गेलं होतं?
5) कोको बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं का?
6) तुम्ही ड्रग्ज अॅडिक्ट आहात का?
7) एखाद्या ड्रग्ज सप्लायरला ओळखता?
8) कधी एखाद्या पेडलरकडून ड्रग्ज मागवलं?
9) ड्रग्ज वगळता इतर कोणती नशा करता?
10) इंडस्ट्रीमधले ड्रग अॅडिक्ट कोण आहेत?
11) तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपच्या अॅडमिन आहेत का? ज्यात ड्रग्स विषयी चॅट झाले?

सारा अली खानला काय प्रश्न विचारले जाणार?

1) सुशांतशी मैत्री कधी झाली?
2) सुशांतच्या फार्म हाऊसवर कधी पार्टी केली होती.
3) सुशांतशी किती वर्षांपासून ओळख होती? श्रद्धा कपूरला ओळखते का?
4) रिया आणि सुशांतसोबत कधी कुठल्या ड्रग्जच्या पार्टीमध्ये सामील झाली होती का?
5) सुशांतसोबत बँकॉक टूरमध्ये काय झालं होतं आणि कोण कोण त्याच्यासोबत होतं?
6) सुशांतसोबत केदारनाथच्या सेट वर ड्रग्ज घेतले होते का ?
7) रियाने सांगितलं की साराकडून सुशांत आणि रियाने पहिल्यांदा ड्रग्ज मागवले होते. त्यामुळे ती कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का?
8) बॉलिवूडमध्ये कोण कोण ड्रग्ज घेतं काही माहिती आहे का?
9) पावना डॅम येथील बोट चालकचा स्टेटमेंट साराला ऐकवलं जाणार आणि त्यावर तिला विचारण्यात येणार
10) कुठलं अजून व्यसन आहे का?
11) सारा कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का? जर होती तर ती संपर्कात कशी आली
12) सुशांत ड्रग्ज घेत होता का? आणि कोण त्याला ड्रग्ज देत होतं?
13) बॉलिवूडमध्ये ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये कधी सारा गेली होती का? तिथे कधी ड्रग्ज घेतले होते का?
14) ड्रग्ज चॅट संदर्भात आणि रियाच्या जबाबा वर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.
15) जया सहा आणि श्रुती मोदीला ओळखते का? कधीपासून ते सुशांतला ड्रग्ज पुरवत होते का?
16) सुशांतच्या स्टाफने जबाब दिला आहे की सारा सुशांतच्या पार्टीमध्ये असायची. त्यावर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.

श्रद्धा कपूरला काय प्रश्न विचारले जाणार?

1) जया सहाला ओळखते का?
2) ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात आहे का? आणि कशी आली?
3) सुशांतच्या घरी किंवा फार्महाऊसवर पार्टी केली आहे का?
4) पावना डॅम येथील आयलेंड वर कधी ड्रग्ज पार्टीला गेली होती?
5) कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?
6) फिल्म छिछोरेच्या वेळी कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?
7) सुशांतशी मैत्री कधी झाली?
8) जगदीशने जबाब दिला आहे की श्रद्धा सुद्धा ड्रग्जपार्टीमध्ये असायची त्या जबाबाच्या आधारित प्रश्न विचारण्यात येणार. काय झालं होतं? कोण कोण होतं पार्टीमध्ये?
9) सुशांत ड्रग्ज घेत होत का? कोण आणून देत होतं?
10) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात प्रश्न असतील?

संबंधित बातम्या :

दीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी? WhatsApp कडून खुलासा

एनसीबीच्या प्रश्नांना सामोरी जाणार बॉलिवूडची ‘मस्तानी’, चॅटमध्ये ‘माल’चा उल्लेख पडला भारी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *