Drugs Case | करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, 2019 मधील ‘त्या’ व्हिडिओवर उत्तर द्यावे लागणार!

शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB)कडे चित्रपट निर्माते करण जोहर (Karan Johar) यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

Drugs Case | करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, 2019 मधील 'त्या' व्हिडिओवर उत्तर द्यावे लागणार!
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 10:39 AM

मुंबई : शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB)कडे चित्रपट निर्माते करण जोहर (Karan Johar) यांच्या विरोधात तक्रार दिली होती. सप्टेंबरमध्ये करण जोहरला याबाबत एनसीबी नोटीस पाठविली होती. आज म्हणजेच 18 डिसेंबर रोजी करण जोहरला एनसीबीला या संदर्भात उत्तर द्यावे लागणार आहे.(NCB to investigate Karan Johars party video)

परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे करणला उत्तर देण्यासाठी एनसीबी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासाठी तो आपले प्रतिनिधी पाठवू शकतो. काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट तपासासाठी एनसीबीकडे सोपवावे लागणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी या संबंधित तपास हाती घेतला होता. या तपासात ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर येत होते.

चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते. या पार्टीमध्ये सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी एनसीबीचे अध्यक्ष राजेश अस्थाना यांची भेट देखील घेतली होती. अर्जुन रामपालची एनसीबीने 16 डिसेंबर रोजी चौकशी केली होती.

यासर्व प्रकरणात करण जोहरच्या अडकण्याची शक्यता आहे. करणला एनसीबीला सांगावे लागणार की, त्या पार्टीत कोण-कोण अभिनेते आणि अभिनेत्री होते. पार्टी कधी झाली होती? त्या पार्टीत ड्रग्स घेतले होते का? करणने तो व्हिडिओ कोणत्या कॅमेर्‍याचे शूट केला होता? एकूणच करणला एनसीबीला सर्व माहिती द्यावी लागणार आहे.

करण जोहरने या व्हिडीओसंदर्भात आधीच स्पष्टीकरण दिले आहे. करणचे म्हणणे आहे की, त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेण्यात आले नव्हते. असे आरोप करून आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या प्रकरणात आज करण जोहर एनसीबीला काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण ड्रग्ज प्रकरणात धर्मा प्रोडक्शन या प्रॉडक्शन कंपनीत काम करणारे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांनाही अटक झाली होती. तथापि, तो जामिनावर बाहेर आहे.

संबंधित बातम्या : 

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा

पांढऱ्या केसांमुळे करण जोहरची थट्टा, वाढदिनी नवा लूक प्रेक्षकांसमोर

(NCB to investigate Karan Johars party video)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.