नीतू कपूरच्या आई आणि आजी होत्या तवायफ, अभिनेत्रीच्या आईने कशी केली ‘त्या’ जगातून स्वतःची सूटका?
नीतू कपूर यांच्या आई आणि आजीबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती, दोघीही होत्या तवायफ, अभिनेत्रीच्या आईने कशी 'त्या' विश्वातून स्वतःची सुटका आणि कसं केलं नीतू कपूर यांना प्रसिद्ध अभिनेत्री?

अभिनेत्री नीतू कपूर यांच्या कुटुंबाबद्दल जी काही माहिती समोर आली ती, काही अशा प्रकारे होती… 10 वर्षांची मुलगी हरजीत सिंगच्या नातेवईकांनी कोठ्यासारख्या वाईट ठिकाणी पाठवलं. आपलेच दगा, फसवणूक करतात… असं काही हरजीत सिंग यांच्यासोबत देखील झालं. हरजीत सिंग यांची फसवणूक करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर, त्यांचेच काकी – काका होते. असं सांगितलं जातं की, तवायफ म्हणून आयुष्य जगत असताना, हरजीत सिंग यांनी तेथील दलाल फतेह सिंग यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील त्यांचं काम सुरु राहिलं.
लग्नानंतर हरजीत सिंग आणि फतेह सिंग यांनी त्यांच्या मुलीचं जगात स्वागत केलं आणि तिचं नाव राझी सिंग असं ठेवलं. राझी यांचं बालपण देखील कोठ्यात गेलं. पण प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. अभिनेत्री होण्याची इच्छा राझी यांनी आई – वडिलांकडे व्यक्त केल्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली.
अखेर राझी यांनी देखील कोठ्यावर काम करण्यास सुरुवात केली. पण त्यांचं मन सिनेमांमध्ये रमत होतं. अखेर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीत आल्या. राझी यांनी दिल्लीत एका मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काम करत असताना त्यांनी दर्शन सिंग सोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मुलीचं जगात स्वागत केलं आणि तिचं नाव हरनीत असं ठेवलं.
त्याच हरनीतला आज संपूर्ण जग नीतू कपूर म्हणून ओळखत आहे. हरनीत जेव्हा लहान होत्या, तेव्हाच त्यांचे आई – वडील त्यांना घेवून मुंबईत आले. दरम्यान राझी यांनी सिनेमात कोणता रोल मिळतोय का? यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पण तेव्हा वेळ निघून गेली होती.आपल्याला सिनेमात काम मिळणार नाही… हे राझी यांनी कळलं होतं.
स्वतःच स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी मुलीला म्हणजे नीतू कपूर यांना सिनेमात काम करण्यास सांगितलं. राजश्री प्रॉडक्शने हरनीत कौर यांना बालकलाकार म्हणून सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. हरनीत कौर यांनी जिसमें ‘दस लाख’, ‘दो दुनी चार’ आणि ‘दो कलियां’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. बालकलाकार म्हणून देखील त्यांना यश मिळालं.
बालकलाकार म्हणून लेकीला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आईला वाटलं माझी मुलगी बालकलाकार म्हणून राहिल. म्हणून 3 वर्ष राझी यांनी लेकीला इंडस्ट्रीपासून दूर ठेवलं. त्यानंतर राझी यांनी हरनीत कौरची ओळख नीतू सिंग म्हणून जगाला करुन दिली.
नीतू कपूर यांचा पहिला ‘रिक्शावाला’ सिनेमा फ्लॉप ठरला. लेकीला फ्लॉप अभिनेत्री म्हणून टॅग लागू नये म्हणून आईने नीतू सिंग यांनी बोल्ड फोटोशूट करण्यास सांगितलं. अखेर मॅगझीनमध्ये नीतू कपूर यांचे फोटो आल्यानंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागली.
1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ सिनेमात नीतू कपूर यांनी दमदार अभिनय करत चाहत्यांच्या मनावर आणि इंडस्ट्रीवर राज्य केलं. त्यानंतर नीतू कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज नीतू कपूर यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही.
