शनिवार – रविवार तुमच्यासाठी देखील ठरेल खास; आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ५ सिनेमे
शनिवार - रविवारी काही प्लान नसेल तर, OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ६ सिनेमे आणि वेब सीरिज करतील तुमचं मनोरंजन... जाणून घ्या आज ओटीटीवर काय पाहता येईल नवीन

मुंबई | OTT प्लॅटफॉर्मवर नक्की कोणता सिनेमा आणि कोणती वेब सीरिज पाहावी यासाठी कायम प्रेक्षकांपुढे प्रश्नचिन्ह असतो. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दमदार सिनेमे आणि वेब सीरिज असतात यात काही शंकाच नाही. पण नवीन काही तरी हवं… यासाठी प्रेक्षक प्रतीक्षेत असतात. तर आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच नवीन सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शनिवारी – रविवारी तुमचे काही प्लान नसतील तर, तुम्ही घरी बसून तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित होणारे सिनेमे पाहू शकता.
‘द ट्रायल : प्यार कानून धोखा’ : अभिनेत्री काजोल स्टारर वेबसीरिज ‘द ट्रायल : प्यार कानून धोखा’ ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी-हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये काजोल नोयोनिका म्हणजे एका वकील महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री काजोल हिच्या शिवाय कुब्रा सैत, शीबा चड्ढा आणि जिशू सेनगुप्ता यांच्यासोबत अनेक कलाकार दिसणार आहेत.
‘कोहरा’ : सुविंदर विक्की, बरुण सोबती, मनीष चौधरी, हरलीन सेठी, वरुण बडोला आणि राचेल शेली स्टारर वेब सीरिज ‘कोहरा’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पंजाबच्या ग्रामीण भागातील कथा अनुभवायला मिळणार आहे.
‘हड्डी’ : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा बहुप्रतीक्षीत सिनेमा ‘हड्डी’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘हड्डी’ सिनेमा झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक घोष याने केलं आहे. सिनेमात मोहित रैना, श्रिया पिळगावकर आणि नीना गुप्ता यांसारखे दमदार सेलिब्रिटी दिसणार आहेत.
‘लव्ह टॅक्टिक्स २’ : रोमाँटिक कॉमेडी सिनेमा ‘लव्ह टॅक्टिक्स २’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा लग्नाभोवती फिरताना दिसणार आहे. सिनेमात मुख्य कलाकारांना लग्नासाठी बळजबरी तयार केलं जातं. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.
‘टू हॉट टू हँडल’ : ‘टू हॉट टू हँडल वेब सीरिज आज म्हणजे १४ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. वेब सीरिज प्रचंड रंजक असल्याची चर्चा रंगत आहे. तर शनिवार आणि रविवारी सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे.
