AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निक्की तांबोळीची भावूक पोस्ट पाहून नेटकऱ्यांचेही मन विरघळले; म्हणाले तू तर ‘वाघीण’

निक्की तंबोळीच्या भावूक पोस्टवर चाहत्यांनीही भावनिकच प्रतिक्रिया दिल्या तसेच बिग बॉसनंतर बदललेल्या निक्कीचे कौतुकही केले.

निक्की तांबोळीची भावूक पोस्ट पाहून नेटकऱ्यांचेही मन विरघळले; म्हणाले तू तर 'वाघीण'
Nikki Tamboli Shared Emotional Post
| Updated on: Oct 20, 2024 | 6:38 PM
Share

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. टास्कमध्ये धक्काबुक्की करणे, घरातील इतर सदस्यांसोबत वाद असो, घरात काम न करण्याचा कामचुकारपणा असो किंवा अरबाजसोबतची मैत्री निक्कीची सगळ्यांसाठीच चर्चा होती. घरातील सदस्य तिचा तिरस्कार करतात की प्रेम, कोणाला ती आवडतेय की नाही याबद्दल तिला काही फरक पडताना दिसला नाही. वारंवार रितेश देशमुख यांनीसुद्धा तिची चांगलीच कानउघडणी केल्याचं पाहिलं मात्र निक्कीचं एकच म्हणणं असायचं की मी आहे तशीच शेवटपर्यंत राहणार, कधीही खोटं वागणार नाही,याच मुद्द्यांसह ती शेवटपर्यंत ठामही राहिली. निक्कीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर याच सर्व गोष्टीबद्दल सांगणारी एक लांबलचक पोस्ट केली आहे.

पोस्ट शेअर करत भावना व्यक्त

बिग बॉसच्या घरात असताना निक्कीचे जवळपास सर्वच सदस्यांसोबत वाद झालेले पाहायला मिळाले. तिला शेवटपर्यंत साथ दिलेली पाहायला मिळाली ती अरबाजने. या दोघांची लव्हस्टोरीही तितकीच गाजली. तसंच अरबाजसोबत मिळून तिने सुंदररित्या टास्क खेळले. याच जोरावर ती टॉप ३ पर्यंतही पोहोचली. निक्कीने नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आधीची निक्की आणि आताच्या निक्कीमध्ये काय फरक आहे किंवा बिग बॉसनंतर का फरक झाला आहे हे तिने तिच्या पोस्टमधून शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे.

निक्कीची भावूक पोस्ट

निक्कीने तिचे बिग बॉसमधले काही फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “मी यापुढे कधीच स्वतःवर अविश्वास दाखवणार नाही. कोणी मला समजून घेत नाही किंवा माझ्यावर प्रेम करत नाही किंवा माझं कौतुक करत नाही म्हणून मी स्वतःला यापुढे दोष देणार नाही. माझी किंमत ही त्यांच्या मतावर ठरत नाही. मला माहितीये की माझं काय टॅलेंट आहे. त्यात मी माहीर आहे. पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की आत्मविश्वास हा नेहमी शांत असतो आणि इर्ष्या ही जोरात ऐकू येणारी असते.” अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

निक्कीने पुढे महिलांच्या सक्षमीकरणावरही लिहिलं आहे की, “स्त्रिया जन्मतःच स्ट्राँग नसतात. त्यांच्या आयुष्यातील खाचखळग्यांमुळे त्या तशा बनतात. त्या योद्धा असतात सोबतच त्यांचं मन सोन्याचं असतं. जिथे तुम्ही रडलात तिथे हसा. जिथे हरलात तिथे जिंका. ज्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला त्यांच्यासमोर आत्मविश्वासाने जा. तुमचा इतिहास तुम्हीच लिहा.” अशी पोस्ट निक्कीने केली आहे.

चाहत्यांकडून निक्कीच्या पोस्टवर भावनिक प्रतिक्रिया 

निक्कीने केलेल्या पोस्टचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की,”ही निक्की खूप वेगळी आहे. ती मनाने एक चांगली माणूस आहे.निक्कीमध्ये खूप बदल झाला आहे.”, तर एका युजरने लिहिलं आहे, “बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नाहीस म्हणून काय झालं प्रेक्षकांची मने जिंकलीस तू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Nikki Tamboli

तर एकानं “वाघीण” म्हणत तिचं कौतुक केलं आहे. एकंदरीतच नक्कीने केलेल्या या पोस्टमुळे तिच्यातील झालेला बदल खरोखरचं सर्वांना भावल्याचं या सगळ्या कमेंटवरून दिसून येत आहे.

निक्की आणि अरबाजची जोडी चर्चेत

सध्या निक्कीबद्दल सांगायचं झालं तर तिचे आगामी चित्रपटांवर काम सुरु आहे. तसेच निक्की आणि अरबाज आता बऱ्याचदा एकत्रित वेळ घालवताना दिसतात. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्रितच पाहिलं जातं आहे. मुळात म्हणजे त्यांची जोडी चाहत्यांना पाहायला आवडतेय. तर काही जणांचे म्हणणे आहे की बिग बॉगच्या घरातील जोड्या बाहेर आल्यावर फार कमी वेळ टिकतात, आता यांची जोडी किती दिवस टिकणार हे पाहायचं आहे. अरबाज आणि निक्की मात्र कोणत्याच कमेंटवर प्रतिक्रिया न देता एकमेकांसोबत वेळ घालवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.