निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार!

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या सीझनमध्ये टॉप 3 पर्यंत गेलेली स्पर्धेक निक्की तांबोळी (Nikki tamboli) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या सीझनमध्ये टॉप 3 पर्यंत गेलेली स्पर्धेक निक्की तांबोळी (Nikki tamboli) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबद्दल स्वत: निक्कीने खुसाला केला आहे. मात्र, अद्याप हे समजून शकले नाही की, नेमक्या कुढल्या चित्रपटातून निक्की बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. (Nikki Tamboli will be entering Bollywood)

निक्कीने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्री एक वेगळी ओळख निर्माण केली असून तिने ‘कंचना 3’ (Kanchana 3), ‘चिकती गदिलो चितकोतुडु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. निक्कीने बिग बॉस 14 चे सीझन संपल्यानंतर एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, बिग बॉस 14 च्या घरातील तिचा प्रवास म्हणावा तेवढा सोप्पा नव्हता कारण बिग बॉसच्या घरात तिचे कोणी मित्र-मैत्रिण नव्हते आणि ती कोणालाही ओळखत नव्हती.

त्यानंतर निक्की आणि रूबीनाची चांगली मैत्री झाली. बिग बॉस 14 ची विजेता रुबीना झाल्याबद्दल निक्कीला विचारण्यात आले तेव्हा निक्कीने सांगितले की, माझी बहिण बिग बॉस 14 ची विजेता झाली आहे याचा मला अतिशय आनंद आहे. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार? हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला, त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत होते, म्हणजेच जरी बिग बॉस 14 ची विजेती म्हणून बिग बॉसने रुबीनाच्या नावाची घोषणा केली.

असली तरी देखील गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली होती. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटतं होते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती.

संबंधित बातम्या : 

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

Thalaivi | लवकरच ‘थलायवी’ प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Deepika Padukone : दीपिका पादुकोण बनली Levi’s ब्रँडची भारतातील पहिली महिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

(Nikki Tamboli will be entering Bollywood)

Published On - 10:50 am, Thu, 25 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI