दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावर नोराचे संतापजनक उत्तर; म्हणाली ‘तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल…’
नोरा फतेहीने दाऊदशी संबंधित ड्रग्ज पार्टीत उपस्थित असल्याच्या आरोपाचे खंडन केलं आहे. मुंबई पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदाराशी जोडलेल्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला असून, त्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यात नोराचे देखील नाव आहे. पण तिने या गोष्टीला साफ विरोध केला आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने या सर्व आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच तिची बदनामी केली जात असल्याचा दावा केल आहे.

भारतीय चित्रपट, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंध असल्याच्या अनेक बातम्या कित्येकदा समोर आल्या आहेत. पण आता एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे कनेक्शन समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या अँटिक-नार्कोटिक्स सेल (एएनसी) ने एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे ज्याचे संबंध थेट दुबईतील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम डोलाशी जोडलेले आहेत. अशा ड्रग्ज पार्ट्यांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली त्यात नोरा फतेहीचे देखील नाव आहे. त्यावर आता नोराने स्पष्टिकरण दिले आहे. तिने याबद्दल एक पोस्टही केली आहे.
नोराने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे
नोराने ही पोस्ट करत म्हटलं आहे, ” मी अशा पार्ट्यांमध्ये जात नाही.. मी सतत प्रवास करत असते. मी कामावर प्रेम करते.त्यासाठी माझे वैयक्तिक आयुष्यही नाहीये. मी स्वतःला अशा लोकांशी जोडत नाही.. आणि माझ्या सुट्टीच्या दिवशी मी दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर किंवा माझ्या हायस्कूलच्या मित्रांसोबत घरी असते. मी माझे संपूर्ण दिवस आणि रात्री माझ्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर काम करत असते. तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. जाणूनबुजून मला लक्ष्य केलं जात आहे. पण यावेळी मी ते होऊ देणार नाही. हे आधी एकदा घडले होते, तुम्ही लोकांनी खोटे बोलून मला संपण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी ते शांतपणे पाहत होतो. जेव्हा प्रत्येकजण माझे नाव बदनाम करण्याचा, माझी प्रतिष्ठा कलंकित करण्याचा आणि मला क्लिकबेट म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत होता. माझ्याशी काहीही संबंध नसलेल्या परिस्थितीत माझे नाव आणि प्रतिष्ठा वापरण्यापासून कृपया दूर रहा. याची मोठी किंमत मोजावी लागेल.” असा संताप तिने व्यक्त केला आहे.
- Nora Fatehi Post
ताहिर डोलाने नक्की काय गुपित उघड केलं होतं
सलीम डोला यांचा मुलगा ताहिर डोला याची सखोल चौकशी केल्यानंतर या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झाला. या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याच्या चौकशीदरम्यान ताहिरने अनेक धक्कादायक खुलासे केले ज्यामुळे तपास संस्थांना बॉलीवूडमधील बऱ्याच गोष्टी समजल्या. ताहिर डोलाने कबूल केले की त्याने आयोजित केलेल्या हाय-प्रोफाइल ड्रग्ज पार्ट्यांमध्ये अनेक प्रमुख बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री, रॅपर आणि चित्रपट निर्माते सहभागी झाले होते. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन आणि इतर सिंथेटिक ड्रग्जचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली होती.
View this post on Instagram
पार्टीत कोण कोण उपस्थित होते?
ताहिर डोलाने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील अनेक धक्कादायक नाव समोर आली त्यातील नावे होती अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झीशान सिद्दीकी, लोकप्रिय रॅपर लोका, चित्रपट निर्माती जोडी अब्बास-मस्तान, मॉडेल अलिशा पारकर जो की दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा मुलगा आहे . तसेच सोशल मीडिया पर्सनॅलिटी ओरी ज्याला ओरहान म्हणूनही ओळखले जाते, यांचाही समावेश आहे.
माहितीनुसार, ताहिर डोलाने सांगितले की, हे व्यक्ती केवळ मुंबई आणि गोव्यात नियमितपणे ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभागी होत नव्हते तर दुबई आणि थायलंडसारख्या देशांमध्येही हाय-प्रोफाइल पार्ट्या आयोजित करत होते. भारतीय वंशाच्या व्यावसायिकांमार्फत या परदेशी पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, ज्यामुळे सिंडिकेटचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे सिद्ध होते.
ताहिर डोलाने नाव दिलेल्या सर्व प्रमुख व्यक्तींना समन्स बजावणार
या संपूर्ण नेटवर्कची संवेदनशीलता पाहता, तपास आता फक्त मुंबई गुन्हे शाखेपुरता मर्यादित राहिलेला नाही. ईडी देखील तपासात सामील झाले आहे. ईडीला संशय आहे की या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे बेकायदेशीर पैसे हवाला आणि रिअल इस्टेटसारख्या माध्यमातून ते पैशांचे रुपच बदलेल जाते. देश आणि परदेशाशी संबंध असलेला हा एक मोठा मनी लाँडरिंग खटला असू शकतो. मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे की ते लवकरच ताहिर डोलाने नाव दिलेल्या सर्व प्रमुख व्यक्तींना समन्स बजावणार आहेत. त्यांचे जबाब नोंदवले जातील आणि सिंडिकेटमध्ये त्यांच्या सहभागाची सखोल चौकशी केली जाईल. ड्रग्ज, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंधांवर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरू शकते, ज्यामुळे भारतीय मनोरंजन उद्योगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
