लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; अमृता फडणवीसांचा सल्ला!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; अमृता फडणवीसांचा सल्ला!
कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. बऱ्याच वेळा अमृता फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. आज अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करून मुलींना शिकवा असं आवाहन केलं आहे. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. (On the occasion of Girls’ Day Amruta Fadnavis tweeted)

अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. मात्र, बऱ्याचवेळा अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना ट्रोल केले जाते पण याकडे अमृता फडणवीस या दुर्लक्ष करतात. अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकताच प्रदर्शित झाले होते. ‘अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी गाणं गायलं आहे. या गाण्याच्या संगीतातून सिनेमात गूढ विषय हाताळल्याचं दिसतं. जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे. चित्रपटातील मंदार पोंक्षे या मराठमोळ्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गुलशन देवय्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर चक दे इंडिया, प्रेमाची गोष्ट अशा सिनेमांमध्ये झळकलेली, क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी- अभिनेत्री सागरिका घाटगेही पुन्हा मराठी सिनेमात झळकणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : अलग मेरा ये रंग है… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

(On the occasion of Girls’ Day Amruta Fadnavis tweeted)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI