AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMDb रेटिंग 8.1 असणाऱ्या या चित्रपटाला मिळणार 3 नॅशनल अवॉर्ड, OTT वर पाहण्यासाठी तुफान गर्दी

IMDb वर साऊथच्या या चित्रपटाला मिळाली 8.1 रेटिंग. 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला मिळणार 3 नॅशनल अवॉर्ड. तुम्ही पाहिला का हा चित्रपट?

IMDb रेटिंग 8.1 असणाऱ्या या चित्रपटाला मिळणार 3 नॅशनल अवॉर्ड, OTT वर पाहण्यासाठी तुफान गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 22, 2026 | 2:36 PM
Share

एखादा चित्रपट संपल्यानंतरही त्याची कथा बराच काळ मनात आणि डोक्यात घर करून राहते. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयन आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अमरन’. भारतीय लष्करातील शहीद मेजर मुकुंद वरदराजन यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली आहे. IMDb वर या चित्रपटाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.

‘अमरन’ हा तमिळ चित्रपट भारतीय सैन्यातील शहीद मेजर मुकुंद वरदराजन यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदानाची सत्यकथा मांडतो. चित्रपटात शिवकार्तिकेयन यांनी मेजर मुकुंद यांची भूमिका साकारली आहे, तर साई पल्लवीने त्यांच्या पत्नी इंदू रेबेका वर्गीस यांची भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी केवळ मेजर मुकुंद यांच्या काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रित केलेले नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही तितकेच महत्त्व दिले आहे. प्रेम, लग्न, कुटुंब आणि देशसेवेची जबाबदारी यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.

साई पल्लवीच्या अभिनयाने जिंकले मन

चित्रपटातील इंदू हे पात्र अत्यंत महत्त्वाचे आहे. मेजर मुकुंद यांच्या आयुष्यातील आनंद, चिंता, प्रेम आणि त्यांच्या शहादतीनंतरचा असह्य दुःखद काळ साई पल्लवी यांनी अत्यंत सहजपणे साकारला आहे. विशेषतः पतीच्या निधनानंतर त्यांच्या पात्राच्या भावनांमधून कुटुंबावर होणाऱ्या त्यागाची आणि वेदनेची जाणीव होते.

काही ठिकाणी जाणवतो संथ वेग

‘अमरन’ची लांबी जवळपास 2 तास 49 मिनिटे आहे. त्यामुळे काही प्रसंगांमध्ये चित्रपटाचा वेग थोडा संथ वाटू शकतो. विशेषतः दुसऱ्या भागात कथा काही ठिकाणी लांबलेली जाणवते. मेजर मुकुंद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित कथा असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना आधीच माहीत असल्यास मोठ्या ट्विस्टची अपेक्षा ठेवता येत नाही.

तसेच चित्रपटातील विरोधी पात्रांना फारसा विस्तार दिलेला नाही. मात्र या मर्यादा असूनही मेजर मुकुंद आणि इंदू यांची भावनिक कथा, शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांचा अभिनय आणि प्रभावी संगीत यामुळे ‘अमरन’ हा OTT वर पाहण्यासारखा चित्रपट ठरतो.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक