Bigg Boss OTT Grand Finale highlights : दिव्या अग्रवाल ठऱली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह मिळाले 25 लाख रुपये

Bigg Boss OTT Fastest Updates : बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे.

Bigg Boss OTT Grand Finale highlights : दिव्या अग्रवाल ठऱली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह मिळाले 25 लाख रुपये
divya

मुंबई : बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg Boss OTT)   ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने बाजी मारली आहे. दिव्या अग्रवालने करण, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांना मागे टाकत ट्रॉफी खिशात घातली आहे. या ग्रँड फिनालेला बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख यांंनी हजेरी लावली होती. बिग बॉस ओटीटीची विजेती ठरल्यामुळे दिव्याला बिग बॉस ट्रॉफी तसेच 25 लाख रुपये मिळाले आहेत.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 18 Sep 2021 23:07 PM (IST)

  शमिता शेट्टी बाहेर पडल्यानंतर दिव्या आणि निशांतमध्ये रंगली स्पर्धा

  दिव्या अग्रवालने बिग बॉस ओटीटीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी शमिता शेट्टी स्पर्धेतून बाहेर पडल्यावर  दिव्या अग्रवाल तसे निशांत याच्यात स्पर्धा रंगली होती.

 • 18 Sep 2021 22:58 PM (IST)

  दिव्या अग्रवाल ठऱली बिग बॉस ओटीटीची विजेती, ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचे बक्षीस

  दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती.

  दिव्या अग्रवालला मिळाले ट्रॉफीसह 25 लाख रुपये

 • 18 Sep 2021 20:44 PM (IST)

  भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांची स्पर्धकांसोबत मस्ती

  भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांची स्पर्धकांसोबत मस्ती

  भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांसोबत तुफान मस्ती केली. या दोघांनीही स्पर्धकांना स्पेशल अवॉर्ड दिले.

 • 18 Sep 2021 20:42 PM (IST)

  करण जोहरचं फायनलीस्टना नवं आव्हान

  करण जोहरने बिग बॉस ओटीटीच्या फायनलीस्टना नवं चॅलेंज दिलं आहे.

  बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांना एकमेकांसाठी विजयी भाषण( विनिगं स्पिच) देण्याचं टास्क करण जोहरने दिलं आहे.

  यामध्ये निशांतने शमितासाठी, दिव्याने निशांतसाठी, शमिताने प्रतिकसाठी भाषण केलं.

 • 18 Sep 2021 19:20 PM (IST)

  बिग बॉस ओटीटीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात, कोण बाजी मारणार ?

  बिग बॉस ओटीटीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

  बिग बॉसच्या या सिझनमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

 • 18 Sep 2021 18:55 PM (IST)

  काही वेळातच सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी’चा महाअंतिम सोहळा!

  काही वेळातच सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी’चा महाअंतिम सोहळा!

 • 18 Sep 2021 18:21 PM (IST)

  ग्रँड फिनालेमध्येही दिसणार राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचा धमाकेदार परफॉर्मेंस!

  ग्रँड फिनालेमध्येही दिसणार राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचा धमाकेदार परफॉर्मेंस!

 • 18 Sep 2021 17:59 PM (IST)

  ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल : नारायण राणे

  नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  संजय राऊतांना मी का उत्तर द्यावं? ते काय माझे बॉस नाहीत. मी त्यांच्या प्रश्नाला का उत्तर द्यावं. महाविकास आघाडीचं सरकार पाच काय दहा वर्ष राहावं. ते एकदा तर 25 वर्ष म्हणाले. ते काय बोलतात? दोन पक्षांबरोबर जावून सरकार बनलं आहे. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात त्याला अर्थ नाही

  ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. सरकार आज ना उद्या पडेल

 • 18 Sep 2021 17:56 PM (IST)

  बॉलिवूडची स्टार जोडी जिनिलिया आणि रितेश देशमुख बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड फिनालेमध्ये!

  बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे. बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख बिग बॉस ओटीटीच्या या ग्रँड फिनालेमध्ये दिसणार आहेत.

   

 • 18 Sep 2021 17:30 PM (IST)

  बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

  बिग बॉस ओटीटी ग्रँड फिनालेची वेळ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ ग्रँड फिनालेची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. बिग बॉसचे दर्शक या शोचे थेट प्रक्षेपण वूट अॅपवर पाहू शकतात. हा शो फक्त Viacom च्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

  फिनाले नाईटमध्ये पहिले पाच स्पर्धक आपले सर्वोत्तम सादरीकरण करणार आहेत. एवढेच नाही तर माजी स्पर्धक देखील या शोमध्ये दिसतील, ज्यामुळे ही संध्याकाळ अधिक रंगीबेरंगी होईल. असे म्हटले जातेय की, बिग बॉस ओटीटीचे माजी स्पर्धक ग्रँड फिनालेच्या स्टेजवर आपले नृत्य कौशल्य दाखवू शकतात. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

 • 18 Sep 2021 17:28 PM (IST)

  ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात भारती-हर्षची एंट्री

  ग्रँड फिनालेच्या एक दिवस आधी, कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया शोमध्ये बिग बॉस ओटीटी घरात दाखल झाले आहेत. त्यांनी बीबी ओटीटी पुरस्कारांचे आयोजन केले. फायनलिस्टना टास्क दरम्यान त्यांच्या बिग बॉस ओटीटी आठवणी पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. या टास्क दरम्यान त्याला एक फोटो सुरक्षित ठेवावा लागला, तर दुसरा कट करावा लागला. त्यांच्या सुंदर आठवणी पाहून स्पर्धक खूप भावूक झाले होते.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI