Bigg Boss OTT | ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात स्पर्धक-अभिनेता राकेश बापटची महिला स्पर्धकांवर कमेंट, चिडलेल्या करण जोहरने फटकारले!

‘बिग बॉस ओटीटी संडे का वार’मध्ये (Bigg Boss OTT Sunday Ka Vaar) राकेश बापटचे शमिता शेट्टीसोबत त्याच्या बदलत्या वागण्यावर आणि स्त्रियांबद्दलच्या टिप्पणीवर, करण जोहरने त्याला चांगलेच फैलावर घेतले.

Bigg Boss OTT | ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात स्पर्धक-अभिनेता राकेश बापटची महिला स्पर्धकांवर कमेंट, चिडलेल्या करण जोहरने फटकारले!
Bigg Boss OTT

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी संडे का वार’मध्ये (Bigg Boss OTT Sunday Ka Vaar) राकेश बापटचे शमिता शेट्टीसोबत त्याच्या बदलत्या वागण्यावर आणि स्त्रियांबद्दलच्या टिप्पणीवर, करण जोहरने त्याला चांगलेच फैलावर घेतले. राकेशने एका टास्क दरम्यान टिप्पणी केली होती की, पुरुष स्त्रियांपेक्षा बलवान आहेत. राकेशच्या या विधानावर करणने त्याला चांगलेच फटकारले आणि म्हटले की, तुमच्या या विधानाचा अर्थ असा की, तुम्ही महिलांना कमकुवत समजता.

करण म्हणाला, ‘तुम्ही अशी कमेंट करता कामा नये. आपण अशा काळात जगत आहोत जिथे कोणीही कोणापेक्षा कमी नाही.’ त्याचे स्पष्टीकरण देताना राकेश म्हणतो की, ‘मला माहित आहे की महिलांची शक्ती काय आहे. मी एका घरात वाढलो जिथे अनेक स्त्रिया राहत होत्या.’

शमिताचा राकेशला पाठींबा

यावेळी स्पर्धक मूसने देखील करण जोहरचे समर्थन केले आणि सांगितले की, मी राकेशला सांगितले होते की ताकद लिंगाभेदातून येत नाही. मात्र, शमिताने राकेशला पाठिंबा दिला आणि सांगितले की, राकेशचा त्यावेळीचा अर्थ तसा नव्हता. तो अशा प्रकारे बोलला की, लोकांचा गैरसमज होतो. करणने शेवटी असेही म्हटले की, राकेशला समजणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य देखील आहे.

काय म्हणाली शमिता?

करणने शमिता शेट्टीला विचारले की, राकेशने तिचे हृदय तोडले आहे का? यावर ती म्हणते, ‘राकेशला वाटते की तो मला दुखावू इच्छित नाही आणि माझ्यापासून दूर राहू इच्छित आहे, म्हणूनच तो चुकीचे वागत आहे.’

दिव्या अग्रवालमुळे दोघांच्या नात्यात अंतर?

राकेश आणि शमिता शोच्या सुरुवातीपासून अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. दोघांमधील बंध खूप मजबूत आणि घट्ट होत होते. चाहत्यांनाही दोघांची केमिस्ट्री आवडत होती, पण नंतर अचानक दोघांमध्ये दुरावा सुरू झाला आणि मग दोघांमध्ये भांडण वाढत आहे. कुठेतरी याचे कारण दिव्या असल्याचे सांगितले जात आहे.

वास्तविक, शमिताला दिव्या आणि राकेशचे नाते आवडत नाही. शमिताला असे वाटते की, आता राकेश तिला सोडून दिव्याशी घनिष्ठ संबंध निर्माण ककरू पाहत आहे. अभिनेत्रीचा असेही वाटते आहे की, दिव्या राकेशला तिच्या विरोधात भडकवत आहे आणि तिला तिच्या जागी आणत आहे.

राकेशच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे का?

अलीकडेच नेहा भसीनशी बोलताना शमिता म्हणाली, मला वाटतं राकेशच्या मनात दिव्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. मी तिथे नसते तर, त्याने दिव्याशी आपला नातेसंबंध जोडले असते. राकेशच्या बदलत्या वागण्याने तिलाही दुःख झाल्याचे शमिता सांगते.

हेही वाचा :

Kangana’s Boyfriend: कंगना म्हणते, असला बॉयफ्रेंड हवा गं बाई; पाहा काय आहेत डिमांड

Bell Bottom : अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखवणार जलवा, या दिवशी होईल स्ट्रीमिंग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI