Kangana’s Boyfriend: कंगना म्हणते, असला बॉयफ्रेंड हवा गं बाई; पाहा काय आहेत डिमांड

कंगना सध्या कोणाला डेट करत नाहीये.अशा परिस्थितीत कपिल शर्मानं तिला विचारलं की जर तिचा बॉयफ्रेंड असेल तर तो कसा असावा त्यावर कंगना म्हणाली... (Kangana's Boyfriend: Kangana's Boyfriend should have 'these' qualities, see what are the demands)

Kangana’s Boyfriend: कंगना म्हणते, असला बॉयफ्रेंड हवा गं बाई; पाहा काय आहेत डिमांड

मुंबई : प्रत्येक वीकेंडला कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये सेलिब्रिटी येतात आणि त्यांच्या अनोख्या स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. या वीकेंडला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या ‘थलायवी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पोहोचली आहे.

या दरम्यान कंगनाने ‘द कपिल शर्मा शो’च्या संपूर्ण टीमसोबत खूप मजा आणि धम्माल केली आणि त्यांच्या प्रश्नांची मजेदार उत्तरं दिली. शोच्या सेटवरील काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात अभिनेत्री नारंगी रंगाच्या साडीत दिसत आहे. कंगना जेव्हाही शोमध्ये येते तेव्हा खूप मजा येते होते या वेळीही असंच काहीसं घडणार आहे. या दरम्यान, कंगनानं सांगितलं की तिला कसा बॉयफ्रेंड पाहिजे.

कंगनाला बॉयफ्रेंडमध्ये पाहिजे ‘या’ क्वालिटी

आता सर्वांना माहित आहे की कंगना सध्या कोणाला डेट करत नाहीये.अशा परिस्थितीत कपिल शर्मानं तिला विचारलं की जर तिचा बॉयफ्रेंड असेल तर तो बोलका किंवा शांत कसा असावा? यावर कंगनानं लगेच उत्तर दिलं की तो शांत असावा सोबतच तिनं कारणही दिलं ती म्हणाली की, तिला जास्त बोलणं आवडतं आणि तिला असे लोक आवडतात जे तिचं ऐकत राहतात. नंतर कपिलनं तिला विचारलं की तिला तिचा बॉयफ्रेंड खर्च करणारा असावा की कंजूस? कंगना म्हणाली, ‘कंजूस असावा कारण खर्च मला करायचा आहे.

बॉयफ्रेंड कोणत्या क्षेत्रातील असावा

जेव्हा कोणताही सेलिब्रेट कपिलला त्याच्या प्रश्नांची धाडसी उत्तरे देतो, तेव्हा कपिल शांत राहत नाही, त्याने कंगनाला दुसरा प्रश्न विचारला की ती बॉलिवूडमधून तिचा बॉयफ्रेंड निवडेल ? तर अभिनेत्री म्हणाली की तो बॉलिवूडमधील असो किंवा राजकारणातील याची तिला पर्वा नाही. मात्र तिच्यासोबत केमिस्ट्री असली पाहिजे.

पाहा व्हिडीओ

आता हे सगळ्यांना माहिती आहे की कंगना ही एक बेधडक महिला आहे जी कोणत्याही क्षेत्रातील विषयावर किंवा कोणत्याही मुद्यावर आपलं मत व्यक्त करत असते.

‘या’ कलाकारांसोबत होतं कंगनाचं अफेअर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत ही इंडस्ट्रीतील सर्वात बेधडक अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीतील कोणत्या पुरुषांशी तिचे संबंध आहेत याबद्दल बोलताना ती एकदाही मागेपुढे पाहत नाही. कंगना रानौत तिच्या नातेसंबंधांवर खुलेपणानं चर्चा करते, ज्यामुळे लोक तिचा आदर करतात आणि बरेच लोक तिला ट्रोलही करतात. आधी, क्वचितच कोणत्याही अभिनेत्रीनं तिच्या नातेसंबंधाबद्दल बोलले असेल.आम्ही तुम्हाला सांगतो की हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली यांच्याशी त्यांच्या संबंधांबद्दल जगाला माहिती आहे. या दोन अभिनेत्यांसोबतच, अध्यायन सुमन आणि अजय देवगण यांच्या संबंधांच्या बातम्यांचीही चर्चा होती.

संबंधित बातम्या

Lookalike : सुहाना खानसारखी दिसते ही मुलगी, ग्लॅमरमध्येही शाहरुखच्या लेकीशी तोडीस तोड

KBC 13 : ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’मध्ये झळकणार नीरज चोप्रा आणि श्रीजेश, बिग बींचा ‘हिंदुस्तान जिंदाबाद’चा नारा

Yami Gautam: यामी गौतमची ‘लाख’मोलाची गुलाबी जरीची साडी, किंमत ऐकून तु्म्ही व्हाल थक्क!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI