KBC 13 : ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’मध्ये झळकणार नीरज चोप्रा आणि श्रीजेश, बिग बींचा ‘हिंदुस्तान जिंदाबाद’चा नारा

केबीसी 13 च्या नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये, आपण नीरज चोप्रा आणि श्रीजेशला मोठ्या आनंदानं शोमध्ये प्रवेश करताना पाहू शकता. (KBC 13 : Neeraj Chopra and Sreejesh to star in 'Fantastic Friday' with Amitabh Bachchan)

KBC 13 : 'फॅन्टास्टिक फ्रायडे'मध्ये झळकणार नीरज चोप्रा आणि श्रीजेश, बिग बींचा 'हिंदुस्तान जिंदाबाद'चा नारा

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ सीजन 13 (KBC 13) च्या पुढील ‘फॅन्टास्टिक फ्रायडे’मध्ये कोणते विशेष पाहुणे असतील, हे आता समोर आलं आहे. पुढील आठवड्यात शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली ताकद दाखवणारे सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य पी. श्रीजेश हे केबीसी 13 च्या मंचावर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या या क्विझ रिअॅलिटी शोचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

केबीसी 13 च्या नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये, आपण नीरज चोप्रा आणि श्रीजेशला मोठ्या आनंदानं शोमध्ये प्रवेश करताना पाहू शकता. नीरज आणि श्रीजेश दोघंही प्रेक्षकांना त्यांची पदके दाखवतात आणि शुभेच्छा देतात. नीरजनं लाल कोट परिधान केला आहे आणि श्रीजेश ग्रे कोटमध्ये दिसला. या दोघांनीही प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण केली आहे आणि या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन उत्साहात दिसले. दोघंही येताच अमिताभ बच्चन हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊ लागले.

पाहा खास प्रोमो

सोनी टीव्हीनं केबीसीचा हा प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं – आपल्या देशाचं नाव उंचवणारे अर्थात टोकियो 2020 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज आणि श्रीजेश केबीसी 13 च्या मंचावर. ऐका त्यांचा कौन बनेगा करोडपती मधील संघर्ष आणि ऑलिम्पिकचा अनुभव …

केबीसी 13 चा हा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्येही उत्साह वाढला आहे. बरेच लोक हा भाग पाहण्यासाठी हतबल आहेत. केबीसीच्या अनेक चाहत्यांनी प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक म्हणाला काय प्रोमो आहे. हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. एका वापरकर्त्यानं लिहिलं – या भागाची वाट पाहू शकत नाही. अशाप्रकारे, बर्‍याच लोकांनी त्यांच्या कमेंट्सद्वारे हा भाग पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली.

नीरज चोप्रा पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. तर सोनी टीव्हीच्या कॉमेडी शो द कपिल शर्मा मध्ये आपण श्रीजेशला पाहिले आहे. श्रीजेश त्याच्या हॉकी टीमसह द कपिल शर्मा शोमध्ये सामील झाला होता, जिथे त्यानं विनोदानं आपले टोकियो ऑलिम्पिकचे अनुभव शेअर केले. यावेळी नीरज चोप्रा देखील एका रिअॅलिटी शोमध्ये आपले अनुभव सांगण्यासाठी सज्ज आहे.

संंबंधित बातम्या

Birthday Special: नागार्जुन अमला अक्किनेनीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, असं केलं होतं प्रपोज

Yami Gautam: यामी गौतमची ‘लाख’मोलाची गुलाबी जरीची साडी, किंमत ऐकून तु्म्ही व्हाल थक्क!

Bigg Boss 15 : जंगलात डासांना पळवताना दिसला सलमान खान, यावेळी स्पर्धकांचा जंगलापासून सुरू होईल प्रवास ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI