Binge Watch | ‘हम दो हमारे दो’पासून ते ‘डिबुक’ पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार मनोरंजनाची मेजवानी!

जिथे एकीकडे, चित्रपटगृहे पूर्णपणे उघडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बुक केल्या आहेत. दुसरीकडे, OTT प्लॅटफॉर्मवरही मनोरंजनाची मेजवानी सुरू राहणार आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी अनेक वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत.

Binge Watch | ‘हम दो हमारे दो’पासून ते ‘डिबुक’ पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार मनोरंजनाची मेजवानी!
OTT Release

मुंबई : जिथे एकीकडे, चित्रपटगृहे पूर्णपणे उघडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बुक केल्या आहेत. दुसरीकडे, OTT प्लॅटफॉर्मवरही मनोरंजनाची मेजवानी सुरू राहणार आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी अनेक वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, झी 5 आणि डिस्ने प्लॅटफॉर्मवर आज (29 ऑक्टोबर) कोणत्या वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते आपण जाणून घेऊया…

हम दो हमारा दो (Hum Do Humare Do)

बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि क्रिती सेनन यांचा ‘हम दो और हमारे दो’ हा चित्रपट आज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. अभिषेक जैन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ती खुराना देखील दिसणार आहेत. हा विनोदी चित्रपट असेल. दिनेश विजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांनी ‘स्त्री’, ‘बाला’, ‘लुका छुपी’, ‘रुही’ आणि ‘मिमी’सारखे चित्रपट केले आहेत. क्रितीला आई-वडील आणि कुत्रा असलेल्या मुलाशी लग्न करायचे आहे. राजकुमार क्रितीशी लग्न करण्यासाठी बनावट पालक आणतो. राजकुमार बनावट पालकांच्या मदतीने क्रितीशी लग्न कसे करतो, हे पाहणे मनोरंजक असेल. चित्रपटात भरपूर कॉमेडी आहे. परेश रावल आणि रत्ना पाठक यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल.

डिबुक (Dybbuk: The Curse Is Real)

आज, इमरान हाश्मी आणि निकिता दत्ता यांचा हॉरर थ्रिलर डिबुक – द कर्स इज रियल अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित होणार आहे. हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा रस पौराणिक कथांपासून प्रेरित आहे. यामध्ये, एक दुष्ट आत्मा जुन्या बॉक्समधून मुक्त होतो आणि नंतर मानवी शरीरात प्रवेश करतो.

मॅराडोना ब्लेस्ड ड्रीम

‘मॅराडोना ब्लेस्ड ड्रीम’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, जो आज म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी Amazon Prime वर प्रदर्शित होत आहे. हा स्पोर्ट्स ड्रामा फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोनाचा बायोपिक आहे. ही एक स्पॅनिश मालिका आहे. ती इंग्रजी भाषेतही प्रसिद्ध झाला आहे.

आफत-ए-इश्क

‘आफत-ए-इश्क’ आज (29 ऑक्टोबर) झी 5वर प्रदर्शित होणार आहे. इंद्रजित नट्टोजी दिग्दर्शित हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे. यात नेहा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल, अमित सियाल आणि नमित दास हे कलाकार दिसणार आहेत. या मालिकेत नेहा शर्मा 30 वर्षांच्या लुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

Actress Samantha Ruth Prabhu : सामंथाने शेअर केले दुबई ट्रिपचे सुंदर फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ

नाना पाटेकरांना दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून मनीषा कोईराला रागाने लालबुंद झाली, वाचा पुढे काय झालं…

‘पत्थर के फूल’च्या चित्रीकरणादरम्यान सतत भांडायचे रवीना-सलमान, एकत्र काम करण्यासही दिला होता नकार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI