Chura Ke Dil Mera 2.0 : शिल्पा शेट्टीच्या नृत्याने पुन्हा एकदा जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘चुरा के दिल मेरा’च्या नव्या व्हर्जनवर लाईक्सचा पाऊस!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) कमबॅक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शिल्पा पुन्हा एकदा ‘हंगामा 2’ सह मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘हंगामा 2’चा ट्रेलर रिलीज झाला असून, आता पहिले गाणेही रिलीज झाले आहे.

Chura Ke Dil Mera 2.0 : शिल्पा शेट्टीच्या नृत्याने पुन्हा एकदा जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘चुरा के दिल मेरा’च्या नव्या व्हर्जनवर लाईक्सचा पाऊस!
चुरा के दिल मेरा 2.0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) कमबॅक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शिल्पा पुन्हा एकदा ‘हंगामा 2’ सह मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘हंगामा 2’चा ट्रेलर रिलीज झाला असून, आता पहिले गाणेही रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव ‘चुरा के दिल मेरा 2.0’ (Chura Ke Dil Mera 2.0 ) आहे. ज्यामध्ये शिल्पा मीझान जाफरीसोबत डान्स करताना दिसत आहे (Shilpa Shetty And Meezaan Jaaferi upcoming Movie Hungama 2 song Chura Ke Dil Mera 2.0 release).

गाणे शेअर करताना शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर कॅप्शन लिहिले की, ‘नवीन बाटलीमध्ये जुनी वाईन..अक्षय कुमारला मिस केले, पण सध्या मीझानचे मन जिंकण्याची वेळ आली आहे.’

शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘हंगामा 2’ या तिच्या कमबॅक चित्रपटाचे ‘चुरा के दिल मेरा 2.0’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

पाहा गाणे :

शिल्पा शेट्टी आणि मीझान यांचे ‘चुरा के दिल मेरा’ हे गाणे ‘मै खिलाडी तू अनारी’ या चित्रपटाचे असून, नव्याने तयार करण्यात आले आहे. हे मूळ गाणे शिल्पा आणि अक्षय कुमारवर चित्रित करण्यात आले होते. 90च्या दशकात या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली होती. आता त्याची 2.0 आवृत्तीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

शिल्पाचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 13 वर्षानंतर ‘हंगामा 2’मधून चित्रपट विश्वात परतत आहे. ती अखेर 2007मध्ये आलेल्या ‘आप’ या चित्रपटात दिसली होती. शिल्पाच नव्हे तर राजपाल यादव देखील बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहेत. त्यामुळे या विनोदी धामालीची सगळेच चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मजेदार ट्रेलर

या चित्रपटात शिल्पा शेट्टी चक्क परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. परेश रावल गोंधळून जातात की, मीझान त्यांची पत्नी शिल्पाचा प्रियकर आहे. परेश रावल यांचा हा गोंधळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पोट धरून हसायला लावतो. आता हा गोंधळ कसा दूर होतो, यासाठी तुम्हाला चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल.

‘हंगामा 2’ हा चित्रपट ‘हंगामा’ फ्रेंचायझीचा दुसरा चित्रपट आहे. अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी, रिमी सेन ‘हंगामा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते आणि हा सुपरहिट चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘हंगामा 2’ थिएटरमध्ये नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शन यांनी ‘हंगामा 2’चे दिग्दर्शन केले आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे.

(Shilpa Shetty And Meezaan Jaaferi upcoming Movie Hungama 2 song Chura Ke Dil Mera 2.0 release)

हेही वाचा :

Mandira Bedi | ‘आरआयपी माय राजी…’, पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली सोशल मीडिया पोस्ट

Drugs Case | ‘बिग बॉस’ फेम एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अटक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI