Mandira Bedi | ‘आरआयपी माय राजी…’, पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली सोशल मीडिया पोस्ट

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचा पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे निधन झाले आहे. मंदिरा बेदीने स्वत: पतीचे अंत्य संस्कार केले. यादरम्यान अभिनेत्री खूपच खचलेली दिसत होती. अशा परिस्थितीत मंदिरा बेदीने आता सोशल मीडियावर पती राज कौशलची अतिशय खास पद्धतीने आठवण शेअर केली आहे.

Mandira Bedi | 'आरआयपी माय राजी...', पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली सोशल मीडिया पोस्ट
मंदिरा-राज
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 2:20 PM

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचा पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे निधन झाले आहे. मंदिरा बेदीने स्वत: पतीचे अंत्य संस्कार केले. यादरम्यान अभिनेत्री खूपच खचलेली दिसत होती. अशा परिस्थितीत मंदिरा बेदीने आता सोशल मीडियावर पती राज कौशलची अतिशय खास पद्धतीने आठवण शेअर केली आहे. मंदिरा आणि राज यांचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहतेही भावनिक झाले. या फोटोमधून दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम होते, हे समजते (Mandira Bedi Share photo with Late Husband Raj Kaushal with emotional caption).

अलीकडेच मंदिरा बेदीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या पतीसोबतचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. मंदिराचे पती राज कौशल यांना जाऊन केवळ 6 दिवस झाले आहेत आणि या फोटोंद्वारे अभिनेत्रीने तिच्या पतीला श्रद्धांजली वाहिली आहे. या फोटोसह अभिनेत्रीने #rip my Raji असे लिहिले आहे आणि ब्रेकिंग हार्टची इमोजी देखील शेअर केली आहे.

पाहा मंदिराची पोस्ट :

मंदिरा बेदीने तिच्या इंस्टाग्रामवर राजसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. या फोटोंमध्ये मंदिरा आणि राज दोघेही हातात ड्रिंक्सचा ग्लास घेऊन एकत्र बसले आहेत आणि खूप आनंदित दिसत आहेत. दोघांच्या गळ्यात एक पदकही दिसत आहे. हे फोटो शेअर करताना मंदिरा बेदी यांनी कोणतेही कॅप्शन लिहिले नाही. त्याऐवजी त्यासोबत कॅप्शन लिहिण्याऐवजी तिने ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिराच्या या पोस्टवर कमेंट करून तिचे बरेच चाहते-मित्रपरिवार तिला सांत्वन देत आहेत. मंदिराचे पती आणि मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता राज कौशल यांचे 30 जून रोजी निधन झाले. राज यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

राज यांना आला होता हृदयविकाराच्या झटक्याचा अंदाज

ई-टाईम्सशी बोलताना राज यांचे मित्र सुलेमान मर्चंट म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून राज यांची तब्येत बरी नव्हती, त्यानंतर त्याने अँटासिड टॅलबेट घेतल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास राजने मंदिराला सांगितले की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर मंदिराने त्यांचा मित्र आशीष चौधरीला बोलावून राज यांना दवाखान्यात नेण्याकी तयारी केली. पण इतक्यात राज बेशुद्ध झाले होते. त्यांनी राजला दवाखान्यात नेले, पण 5-10 मिनिटांनंतर त्यांना समजले की राज यांचा श्वास थांबला आहे. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी खूप उशीर झाला होता.’

सुलेमान यांनी असेही सांगितले की, याआधीही राजला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्याचे वय अवघे 30-32 होते. पण त्या हल्ल्यानंतर राजने स्वत:ची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली होती.

(Mandira Bedi Share photo with Late Husband Raj Kaushal with emotional caption)

हेही वाचा :

Drugs Case | ‘बिग बॉस’ फेम एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अटक

मंदिरा बेदी ते रेखा, ‘या’ बॉलिवूड सेलिब्रेटींनी कमी वयातच गमावले आपले जोडीदार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.