AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…

Pakistani Stars Reaction On Asha Bhosle Death: गायक शुझा हैदर, अली झफर यांच्यासोबतच अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी आशा भोसले यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे... 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 व्या आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला.

आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले...
| Updated on: Apr 13, 2026 | 12:53 PM
Share

Pakistani Stars Reaction On Asha Bhosle Death: दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगभरात फार मोठी आहे. आशा भोसले यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गाय चाहत्यांच्या मनावर आणि संगीतविश्वावर राज्य केलं. पण अचानक आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. महत्त्वाचं म्हणजे फक्त भारतीय सेलिब्रिटींनीच नाही तर, पाकिस्ताना कलाकारांनी देखील आशा ताई यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनेता अहसान खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, “एका युगाचा अंत झाला आहे.” अभिनेता अदनान सिद्दीकी म्हणाला, “अगदी शांत क्षणांनाही भावनांनी भरून टाकण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. आज ती शांतता खूप जड वाटत आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या भावनांसाठी, निर्माण केलेल्या आठवणींसाठी आणि मागे सोडलेल्या जादूसाठी धन्यवाद. तुमचा आवाज नेहमीच ऐकू येईल, कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात.”

गायक शुझा हैदर म्हणाला, “जगातील महान व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचे नाव नेहमीच स्मरणात राहील. एका विशेष अध्यायाचा अंत झाला आहे.” गायक आणि अभिनेता अली जफर याने देखील दुःख व्यक्त करत म्हणाला, “एक प्रतिभावान कलाकार. एक अतुलनीय आवाज. आशा भोसलेजींचं कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. असे आवाज काळाबरोबर पुसले जात नाहीत, तर काळाचाच एक भाग बनतात. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”, सध्या पाकिस्ताना सेलिब्रिटींचे पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आशा भोसले यांचं निधन

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असताना गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशाताईंचं निधन झालं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 एप्रिल रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यापूर्वी, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल. आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.