ऐश्वर्या रायला आयेशा बनवायला निघालेला हा पाकिस्तानी मौलवी कोण? त्याची लायकी दाखवणारे धक्कादायक व्हिडिओ समोर
Aishwarya Rai Bachchan : पाकिस्तानी मौलवी ज्याची लायकी दाखवणारे अनेक व्हिडीओ, महिलांसोबत असंख्य आक्षेपार्ह व्हिडिओ..., ऐश्वर्या रायला आयेशा बनवायला निघालेला हा पाकिस्तानी मौलवी आहे तरी कोण?

Pakistani Maulana Mufti Abdul Qavi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. पाकिस्तानात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दरम्यान, पाकिस्तानातील एका मौलवीने ऐश्वर्याबद्दल असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न करेल… असं मैलवी म्हणाला. शिवाय बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिच्याबद्दल देखील त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं…
पाकिस्तानी मौलवी ऐश्वर्या आणि राखी यांच्याबद्दल काय म्हणाला… राखी सावंत तर मुस्लिम आहे… तिच्यासोबत देखील निकाह करु शकतो.. तिचं नाव फातिमा आहे…’ असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची पाकिस्तानी मौलाना मुफ्ती अब्दुल कावी याची पहिली वेळ नाही… याआधी देखील त्याचे अनेक महिलांसोबत नको ते व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
एवढंच नाही तर, मौलवीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला. ज्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.संतापात एक नेटकरी म्हणाला, ‘आणि याच्यासाठी ऐश्वर्या इस्लाम स्वीकारेल…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वेड्यांचा राजा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आता सलमान खान याला सांगतो…’, सध्या सर्वत्र पाकिस्ताना मौलवीची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
मौलानांचा हरीम शाहशीही वाद
2021 मध्ये मौलाना मुफ्ती कवी आणि हरीम शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हरीम शाहने मौलनावर छळाचा आरोप केला होता. मात्र, मुफ्ती कवी याने सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, हरीम शाहने अब्दुल कवी यांना थप्पड मारल्याचा आरोप आहे.
कंदील बलोच हिच्यासोबत देखील गैरवर्तन
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी मौलाना मुफ्ती अब्दुल कवी याचा पाकिस्तानातील लोकप्रिय इन्फ्लूएंसर कंदील बलोचशी वाद झाला होता. कंदील बलोच हिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये मुफ्तीने तिला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं असा दावा केला होता.
मौलवी सर्व आरोप फेटाळले तेव्हा कंदील हिने सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले… या व्हिडिओंमध्ये तो सिगारेट मागताना आणि कधीकधी कंदीला हिला जवळ बसण्यास सांगताना दिसत होता. शिवाय, अब्दुल कावीचे महिलांसोबतचे असंख्य आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येत राहिले.
