AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंचायत’मधील अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका; आता कशी आहे प्रकृती?

'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'पंचायत'मधील अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका; आता कशी आहे प्रकृती?
Panchayat Actor Asif Khan Suffers Heart AttackImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2025 | 6:42 PM
Share

‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे,त्याची तब्येत आता बरी असून त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आसिफ खानने त्यांच्या आरोग्याची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच, आजाराशी झुंजताना आणि रुग्णालयात असताना त्याला जीवनाचे महत्त्व काय आहे हे देखील कळल्याचं त्याने सांगितले.

‘आयुष्य किती लहान आहे’

आसिफ खान यांनी इंस्टाग्रामवर दोन स्टोरीज शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले आहे – ‘गेल्या 36 तासांपासून हे पाहिल्यानंतर मला जाणवले की आयुष्य किती लहान आहे. कधीही एकही दिवस गृहीत धरू नका. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. तुमच्याकडे जे काही आहे आणि तुम्ही जे काही आहात त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी कोण सर्वात महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांना नेहमी जपा. जीवन ही एक अमुल्य भेट आहे आणि आपण भाग्यवान आहोत.’

आसिफ खानची प्रकृती आता कशी आहे?

आणखी एक गोष्ट शेअर करत, आसिफ खानने त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि तो बरा होत आहे. आसिफने म्हटलं आहे ‘गेल्या काही तासांत माझी प्रकृती ठीक नव्हती आणि मला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी बरा होत आहे आणि पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे. तुमच्या प्रेम, काळजी आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत तुमच्या प्रार्थना आणि आठवणींमध्ये मला ठेवल्याबद्दल धन्यवाद.’

‘पंचायत’मध्ये जावई म्हणून चमकतोय आसिफ खान

प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय वेब सिरीज ‘पंचायत’ मध्ये आसिफ खानने ‘दामादजी’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय तो ‘पाताल लोक’ या मालिकेतही दिसला होता. सोबतच तो ‘काकुडा’ आणि ‘द भूतनी’ या चित्रपटांमध्येही दिसला होता.

View this post on Instagram

A post shared by Aasif Khan (@aasifkhan_1)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.