AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Awarapan 2: ‘आवारापन 2’मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

Paresh Rawal's son in Awarapan 2: अभिनेते परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने 'आवारापन 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Updated on: Aug 19, 2026 | 2:08 PM
Share
तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात इमरानसोबतच दिशा पटानी आणि शबाना आझमी यांसारखे कलाकार दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. याच चित्रपटातून अभिनेते परेश रावल यांच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

1 / 5
इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जर तुम्ही 'आवारापन 2' हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला सिकंदरची भूमिका नक्कीच माहीत असेल. चित्रपटात जारा (दिशा पटानी) आणि जोरावर (पूरन गब्बी) यांचा भाऊ सिकंदरची भूमिका अनिरुद्ध रावलने साकारली आहे.

2 / 5
या चित्रपटात अनिरुद्धने त्याच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनयाची प्रतिभा ही त्याला वडिलांकडून आपसूकच मिळाल्याचं ही भूमिका पाहून समजतं. अनिरुद्धने कोणताही गाजावाजा न करता आपल्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

3 / 5
अनिरुद्धने या चित्रपटात एका ऑटिस्टिक आणि निरागस तरुणाची भूमिका साकारली आहे. त्याचं हे पात्र हिंसेपासून दूर स्वत:च्याच एका वेगळ्या जगात वावरतं. हा साधेपणा अनेकदा प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणतो. सुरुवातीपासून अनिरुद्धचं पात्र शांत दिसत असलं तरी खरा थरार क्लायमॅक्समध्ये उलगडतो.

4 / 5
चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दृश्यात जेव्हा शिवम पंडित (इमरान हाश्मी) आणि खलनायक यांच्यात लढाई होते, तेव्हा अनिरुद्धचं निरागस पात्र एकाच कृतीने कथेची दिशा बदलून टाकतं. या संपूर्ण चित्रपटात त्याने त्याच्या पात्राची देहबोली अत्यंत कुशलतेने हाताळली आहे, त्यामुळे क्लायमॅक्सचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

5 / 5
Follow Us
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह