Parineeti Raghav | परिणीती चोप्रा हिने दिले राघव चड्ढा याला थेट ‘हे’ मोठे गिफ्ट, अभिनेत्रीने धक्का देत…
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी आता यांचे लग्न झाले.

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत राहिले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 13 मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा दिल्ली येथे अत्यंत शाही पद्धतीने साखरपुडा हा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अत्यंत जवळच्या व्यक्तींची उपस्थिती राहिली.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा याचा शाही विवाहसोहळा हा काही दिवसांपूर्वीच राजस्थान येथील उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला अत्यंत खास लोक उपस्थित राहिली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे काही फोटो देखील पुढे आले. यामध्ये यांच्या लग्नाची खास झलक बघायला मिळाली.
आता परिणीती चोप्रा हिने पराघव चड्ढा याला एक अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासाठी खास गाणे गायले आहेत. सर्वांनाच माहिती आहे की, परिणीती चोप्रा हिला गाणे म्हणण्याची प्रचंड आवड आहे. ती एक चांगली गायिका देखील आहे. यापूर्वीही परिणीती चोप्रा हिने काही गाणे गायली आहेत.
परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासाठी खास ओ पिया हे गाणे गाऊन गिफ्ट दिले आहे. या गाण्यातून परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्यावर असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. गौरव दत्ताने हे गाणे कंपोज केले आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा हिने गायलेलले हे ओ पिया गाणे सर्वांनाच प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव राघव चड्ढा हे लग्नानंतर उदयपूर येथून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी परिणीती चोप्रा ही खास लूकमध्ये दिसली. परिणीती चोप्रा आणि राघव राघव चड्ढा यांच्या लग्नाची तयारी ही जोरदार पद्धतीने काही महिन्यांपासूनच सुरू होती. परिणीती चोप्रा आणि राघव राघव चड्ढा यांनी विदेशात लग्नाची खरेदी केली.
