AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करायचे होते पण…’, आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

'या आधी देखील अनेक अभिनेत्रींसोबत बेडरुम सीन, रेप सीन केले पण...', आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल... वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर देखील अभिनेता माफी मागण्यास तयार नाही... सर्वच स्तरातून होतोय अभिनेत्याचा विरोध...

'अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करायचे होते पण...', आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ
| Updated on: Nov 22, 2023 | 12:07 PM
Share

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : ‘लियो’ फेम अभिनेता मंसूर अली खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तृषा हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मन्सूर अली खान याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. तृषा कृष्णन हिच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्याला टिकेचा सामना करावा लागला. तृषा, चिरंजिवी… यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी मन्सूर अली खान याला माफी मागण्यास सांगितलं… पण अभिनेता माफी मागण्यासाठी तयार नाही. याच प्रकरणी आता अभिनेत्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

मंगळवारी झाली चौकशी…

राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर डीजीपी शंकर जिवल यांनी मन्सूर अली खान यांच्यावर कारवाई केली. मन्सूर अली खान याने अभिनेत्री तृषाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चेन्नई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री याप्रकरणी चौकशी करण्यात आली.

रिपोर्टनुसार, अभिनेत्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तरी देखील मन्सूर अली खान माफी मागण्यास तयार नाही. मेगास्टार चिरंजीवी, लोकेश कनागराज आणि इतर अनेकांनी मन्सूर याच्या वक्तव्यावर टीका केली. एनसीडब्ल्यूने तामिळनाडूच्या डीजीपीला मन्सूर अली खानवर कारवाई करण्यास सांगितल्यानंतर मन्सूर अली खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तृषा हिची माफी मागण्यास अभिनेत्याचा नकार

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. आता याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, एक पत्रकार परिषदेत अभिनेत्याने ‘लिओ’ सिनेमात असूनही तृषा हिच्यासोबत स्क्रिन शेअर करता आली नाही. अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करण्याची संधी गमावली असं देखील अभिनेता म्हणाला..

मन्सूर अली खान याच्या आक्षेपार्हवर तृषा, तिचे चाहते आणि सेलिब्रिटींनी टीका केली. या सर्व प्रकारानंतर मन्सूर अली खान याने 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पत्रकार परिषद घेऊन स्वतःचा बचाव केला आणि तृषा हिची माफी मागणार नाही… असं वक्तव्य केलं… ज्यामुळ अभिनेता वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे.

एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर  मन्सूर अली खान याच्यासोबत पुढे कधीच स्क्रिन शेअर करणार नाही… असं वक्तव्य अभिनेत्री तृषा हिने केलं आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.