Trisha: बाहुबली स्टारसोबत फोटो लीक, 5 महिन्यांत मोडला साखरपुडा; चर्चेत राहिली त्रिशाची लव्ह-लाइफ

खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली त्रिशा; 'या' सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं नाव

Trisha: बाहुबली स्टारसोबत फोटो लीक, 5 महिन्यांत मोडला साखरपुडा; चर्चेत राहिली त्रिशाची लव्ह-लाइफ
Trisha
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Sep 30, 2022 | 5:44 PM

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan 1) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आजच (30 सप्टेंबर) हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये दक्षिणेतल्या नामवंत कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री त्रिशाचाही समावेश आहे. त्रिशा कृष्णनने (Trisha Krishnan) बॉलिवूडमध्येही काम केलंय. चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिली. कधी साखरपुडा मोडल्याने तर कधी लिपलॉक फोटो लीक झाल्याने त्रिशा चर्चेत आली होती.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये त्रिशाचं नाव आवर्जून घेतलं जातं. तिचं नाव साऊथ सुपरस्टार विजय, बाहुबली फेम राणा डग्गुबत्ती यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. घिल्ली या चित्रपटाच्या सेटवर त्रिशाची थलपती विजयसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Trish (@trishakrishnan)

बाहुबली स्टार राणासोबतचं त्रिशाचं अफेअर इंडस्ट्रीत चांगलंच चर्चेत होतं. हे दोघं बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणास्तव या दोघांचं ब्रेकअप झालं. त्रिशाचे राणासोबतचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यावेळी हे अफेअर ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरलं होतं.

23 जानेवारी 2015 मध्ये त्रिशाने वरुण मनियनशी साखरपुडा केला होता. मात्र एकेदिवशी अचानक हा साखरपुडा मोडल्याचं वृत्त समोर आलं. वरुण हा चेन्नईमधील व्यावसायिक होता. साखरपुडाच्या पाच महिन्यांनंतर या दोघांचं नातं तुटलं. त्रिशाचा हा साखरपुडा मोडण्यामागे अभिनेता धनुषला कारणीभूत ठरवलं गेलं. कारण त्यावेळी त्रिशा आणि धनुष यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती.

हे सुद्धा वाचा

जलीकट्टूविरोधात वक्तव्य केल्यानंतर त्रिशा विशेष चर्चेत आली होती. ट्रोलिंगनंतर त्रिशाने अखेर तिचा ट्विटर अकाऊंट डिॲक्टिव्हेट केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें