Marathi Movie : प्रियदर्शन जाधवचं ‘लव्ह सुलभ’; चित्रीकरणाला सुरुवात

VN

|

Updated on: Mar 09, 2021 | 3:29 PM

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता या भूमिका अगदी चोखपणे पार पाडणारा प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. (Priyadarshan Jadhav brings new movie, 'Love Sulabh')

Marathi Movie : प्रियदर्शन जाधवचं ‘लव्ह सुलभ’; चित्रीकरणाला सुरुवात
Follow us

 मुंबई : लेखक-दिग्दर्शक-अभिनेता या भूमिका अगदी चोखपणे पार पाडणारा प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. ‘लव सुलभ’ नावाच्या या चित्रपटाची त्यानं घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Priyadarshan Jadhav brings new movie, ‘Love Sulabh’)

ठाण्यात चित्रीकरणाला सुरुवात

ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे विद्यमान महापौर मा.श्री. नरेशजी म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे .

Love Sulabh

देवी सातेरी प्रॉडक्शन्सची निर्मिती

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी ‘लव सुलभ’ चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर,  विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.

‘हे’ कलाकार लावणार चित्रपटाला चार चाँद

प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरुन उत्सुकता शिगेला

‘लव सुलभ’ हे चित्रपटाचं नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता जातोय. टीजर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते पण चित्रपटाच्या कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. चित्रपटाचं नाव, स्टारकास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे.

Love Sulabh

संबंधित बातम्या

Marathi Web Series : मराठी प्रेक्षकांसाठी नवी कोरी वेब सीरीज, ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू

Birthday Special | केवळ तबलावादनच नव्हे, तर अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावणारे उस्ताद झाकीर हुसेन!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI