RaanBaazaar: भूमिका साकारण्याआधी प्राजक्ता, तेजस्विनीने दिली बुधवार पेठ, कामाठीपुऱ्याला भेट

नुकतेच ‘रानबाजार’चे 3 भाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर (Planet Marathi) प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांना चांगला प्रतिसाद मिळाल आहे. सीरिजचा तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना पुढील कथानकाची उत्सुकता लागून राहिली आहे.

RaanBaazaar: भूमिका साकारण्याआधी प्राजक्ता, तेजस्विनीने दिली बुधवार पेठ, कामाठीपुऱ्याला भेट
raanbaazaarImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 7:35 AM

असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?’ अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’ (RaanBaazaar) या वेब सीरिजची (Web Series) सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांचाही या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळतोय. वेब सीरिजच्या पहिल्या टीझरपासूनच खरंतर ‘रानबाजार’ वादळ निर्माण करणार याची खात्री होती आणि तसंच झालं. अवघ्या दोन दिवसांत या सीरिजच्या ट्रेलरला 2 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले. अल्पावधीत एवढी लोकप्रियता प्राप्त करणारी ही पहिली मराठी वेब सीरिज आहे. नुकतेच ‘रानबाजार’चे 3 भाग ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर (Planet Marathi) प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांना चांगला प्रतिसाद मिळाल आहे. सीरिजचा तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना पुढील कथानकाची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता ‘रानबाजार’चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहेत.

प्राजक्ता माळी या सीरिजमधील तिच्या भूमिकेबद्दल सांगते, “यापूर्वी अशा प्रकारची भूमिका मी कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी ‘बबली’ इमेज बदलली. रत्ना साकारणं नक्कीच सोपं नव्हतं. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझं वजन वाढवलं. रत्ना ही देहविक्रेय करणारी महिला आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणं- बोलणं, तिचं राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरा इथं जाऊन तिथल्या महिलांशी संवाद साधला. त्यांचं निरीक्षण केलं. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचं कौतुक केलं. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय.”

हे सुद्धा वाचा

तेजस्विनी पंडित ‘रानबाजार’धील तिच्या व्यक्तिरेखेविषयी बोलते, “आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अगदी सरळसाधी मुलगी ते अतिशय बोल्ड मुलगी. बबली इमेज ते अगदी बायोपिक सिनेमेही केले. परंतु अशा प्रकारची बोल्ड व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारत आहे. अनेक प्रतिक्रिया आल्या, येत आहेत. ज्या अपेक्षित होत्या. त्यामुळे त्यांचा मी मनापासून स्वीकार करत आहे आणि हीच माझ्या कामाची पावती आहे. ज्यावेळी या भूमिकेबद्दल मला विचारणा करण्यात आली त्याक्षणी मी ही ऑफर स्वीकारली. अभिजित पानसे सारखे दिग्दर्शक, दमदार कथानक, ‘प्लॅनेट मराठी’ सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या.”

पहा व्हिडीओ-

“ रानबाजारला मिळणारा प्रतिसाद पाहता, खूप आनंद होतोय. प्रेक्षक असा बोल्ड विषयही स्वीकारत आहेत. त्यांची मानसिकता बदलत आहे. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याची आम्हाला संधी मिळते. ही माझी पहिलीच वेब सीरिज आहे. चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये खूप फरक असतो. चित्रपटाच्या कथेतील सस्पेन्स हा शेवटी समोर येतो. फारफार तर मध्यंतरापूर्वी. मात्र वेब सीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर आणून संपवावा लागतो, जिथे पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. वेब सीरिमध्ये कोणत्याही मर्यादा नसल्याने विचारविनिमयाने आशय बनवावा, या मताचा मी आहे”, अशी प्रतिक्रिया या सीरिजचे लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिली.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेब सीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. यात तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.