Dhurandhar: भारतातील या शहरात आहे रहमान डकैतचे घर, Video होतोय व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये 'धुरंधर' चित्रपटातील रहमना डकैतचे घर व्हायरल होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘धुरंधर.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला आहे. तरीही प्रेक्षक आनंदाने चित्रपट पाहात आहेत. काही प्रेक्षकांनी तर एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील महत्त्वाचे पात्र, रहमान डकैतच्या घराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे घर भारतातील आहे.
‘धुरंधर’ चित्रपटातील स्टारकास्ट जितकी चर्चेत आहे, तितकेच त्याच्या शूटिंग लोकेशन्सचीही चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी फक्त अभिनेत्यांवरच नव्हे, तर प्रत्येक सीनच्या लोकेशनवरही खूप मेहनत घेतली आहे. यामुळेच रिलीज नंतर अक्षय खन्ना साकारलेल्या रहमान डकैतच्या घराची (हवेलीची) चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. चाहत्यांनी शोध घेऊन ते घर शोधून कुठे आहे हे सांगितले आहे.
View this post on Instagram
रहमान डकैतचे घर खरेतर भारतात आहे
‘धुरंधर’ चित्रपटाची कथा जरी पाकिस्तानच्या ल्यारी (कराची) भागात घडत असल्याचे दाखवले असले, तरी बहुतांश शूटिंग पंजाब आणि आसपासच्या भागात झाले आहे. विशेष बाब म्हणजे, रहमान डकैतची भव्य हवेली ही अमृतसरमधील ऐतिहासिक ‘लाल कोठी’ (Lal Kothi) आहे. १९व्या शतकातील ही हवेली चित्रपट टीमने दोन दिवस शूटिंगसाठी वापरली होती. याशिवाय चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन अमृतसर बस स्टँड, लुधियानाजवळील खेडा गाव, सुखना लेक (चंडीगड) आणि गोल्डन टेम्पल परिसरात चित्रीत केले आहेत. या लोकेशन्सचा वापर इतक्या कुशलतेने केला गेला की, प्रेक्षकांना खरंच वाटतंय की दिग्दर्शकाने पाकिस्तानमध्ये जाऊन परवानगी घेऊन शूटिंग केली का?
व्हायरल व्हिडीओ आणि चाहत्यांची उत्सुकता
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही चाहते आणि फिल्म उत्साही अमृतसरच्या लाल कोठीला भेट देताना दिसत आहेत. ते चित्रपटातील फोटो हातात घेऊन प्रत्येक भागाची जुळवाजुळव करत आहेत. रहमान डकैत दरवाज्यात बसलेला सीन असो वा बाल्कनीतून हात हलवतानाचा प्रसंग. ही जागा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना यांच्यासह अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सौम्या टंडन, सारा अर्जुन, गौरव गेरा आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.
