AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण पिढी, खऱ्या प्रेमाबद्दल काजोलचं मोठं वक्तव्य, ‘आजचे तरुण 4 ऑप्शन घेऊन…’

Kajol on Relationship: 'आजचे तरुण 4 ऑप्शन घेऊन...', राज - सिमरन यांच्या प्रेमाचं उदाहरण देत कजोलने सांगितली आजची परिस्थिती, तरुण पिढीबद्दल म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा...

तरुण पिढी, खऱ्या प्रेमाबद्दल काजोलचं मोठं वक्तव्य, 'आजचे तरुण 4 ऑप्शन घेऊन...'
| Updated on: Oct 23, 2024 | 10:04 AM
Share

Kajol on Relationship: ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. राज आणि सिमरन यांच्या भूमिकेत दोघांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहेत, सिनेमातील काही सीन आणि डायलॉग आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दोखील मोठी कमाई केली.

सिनेमातील काजोल आणि शाहरुख यांची लव्ह केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिमरन हिच्यासोबत लग्न करण्यासाठी राजने केलेले प्रयत्न आजही चाहत्यांचं मन जिंकून घेतात. पण आजच्या पिढीमध्ये राज – सिमरन यांच्यासारखं प्रेम राहिलेलं नाही… असं वक्तव्य खुद्द काजोल हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केलं.

सांगायचं झालं तर, काजोल सध्या आगामा सिनेमा ‘दो पत्ती’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान आजच्या काळात राज आणि सिमरन यांच्यासारखी लव्हस्टोरी होऊ शकत नाही. असं काजोल म्हणाली. ‘आजच्या काळात राज – सिमरन पाहायला मिळणं अशक्य आहे. एकमेकांना व्हाट्सएप करत असतात आणि बाजूल 4 ऑप्शन घेऊन फिरतात.. अशी आजची पिढी आहे..’ असं देखील काजोल म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात काजोल मॉर्डन पण तिचे वडील पारंपरिक विचारांचे होते. तर शाहरुख खान स्वतःच्या अटींवर जीवन जगणारा बिनधास्त मुलगा… राज आणि सिमरन यांची भेट कॉलेज ट्रिप दरम्यान होते आणि दोघे एकमेंकाच्या प्रेमात पडतात. अशात जेव्हा शाहरुखला माहिती होतं पंजाब येथे काजोलचं लग्न होत आहे. तेव्हा शाहरुख देखील पंजाबमध्ये जातो आणि काजोलच्या कठोर वडिलांना प्रभावित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये अभिनेत्याला यश देखील मिळतं… सिनेमाला अनेक वर्ष झाली आहेत पण आजची चाहत्यांच्या आवडीच्या सिनेमांपैकी एक सिनेमा आहे.

काजोल स्टारर ‘दो’ पत्ती’ सिनेमा

काजोल आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन लवकरच ‘दो पत्ती’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात काजोल एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात क्रितीचे डबल रोल असणार आहे. सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.