‘राज’ फेम अभिनेता अडकला कायद्याच्या कचाट्यात, कोट्यवधींचा घोटाळा समोर
Raj Fame Actor Dino Morea: सिनेमांपासून दूर असलेल्या 'राज' फेम अभिनेत्याचं मोठं कनेक्शन समोर, कोट्यवधींचा घोटाळा आणि बरंच काही..., अभिनेत्याच्या सोबत भावाचं नाव देखील कोट्यवधींच्या घोटाळ्यात समोर

Raj Fame Actor Dino Moriy: ‘राज’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अभिनेता डिनो मोरिया सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. फक्त डिनो मोरिया याच्यावरच नाही तर, अभिनेत्याचा भाऊ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणात दोन्ही भावांचं नाव समोर आलं आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थित गुन्हे शाखेने दिनो मोरिया याला समन्स देखील बजावला होता. अभिनेत्याची चौकशी देखील झाली आहे.
मिळालेल्या माहिती, मिठी नदी घोटाळ्या प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्याच्या भावाची देखील चौकशी केली आहे. मिठी नदी घोटाळ्या प्रकरणात अभिनेत्याचं नाव समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर फार लोकांना अभिनेत्याच्या कनेक्शनबद्दल फार काही माहिती नाही.
ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याने अभिनेता डिनो मोरिया आणि भाऊ सॅंटिनो मोरिया यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला… सध्या पोलीस कॉल रेकॉर्ड देखील तपासत आहेत. अभिनेत्याची आणि त्याच्या भावाची चौकशी देखील पोलिसांनी केली आहे.
View this post on Instagram
काय आहे मिठी नदी घोटाळा
सांगायचं झालं तर, मिठी नदी घोटाळा मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरलेल्या गाळ पुशर्स आणि ड्रेजिंग मशीनच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. कोची येथील कंपनी मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने आरोप केला आहे की, नदीच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या मशीन्स खूप जास्त दराने भाड्याने घेतल्या आहेत. ज्यामध्ये मोठी अनियमितता झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात केतन कदम आणि जय जोशी हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितलं जात आहे. तर डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅंटिनो मोरिया यांची देखील नावे आता समोर आली आहेत. यांच्यावर मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. संबंधित घोटाळा 65 कोटी रुपयांचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
