AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : 12 तास पाण्यात राहून ‘राजा शिवाजी’ मधील सीन शूट, अभिनेत्रीचा थक्क करणारा खुलासा

Raja Shivaji : तब्बल 12 तास पाण्यात राहून अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमातील एक सीन शूट केला आहे. त्या सीनबद्दल अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टचीच चर्चा रंगली आहे.

Raja Shivaji : 12 तास पाण्यात राहून 'राजा शिवाजी' मधील सीन शूट, अभिनेत्रीचा थक्क करणारा खुलासा
अभिनेत्री दिशा परदेशी
| Updated on: May 07, 2026 | 10:22 AM
Share

Raja Shivaji Underwater Shoot: ‘राजा शिवाजी’ सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सिनेमातील जिनिलिया, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारख्या बड्या सेलिब्रिटींनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण ज्या अभिनेत्रीने 12 तास पाण्यात राहून जो सीन शूट केला आहे, तो हैराण करणारा आहे.. सीन शूट करताना अभिनेत्री दिशा परदेशी हिने कोणत्या संकटांचा सामना केला आहे आणि अभिनेता रितेश देशमुख याची कशी मदत मिळाली याबद्दल सांगितलं आहे.

दिशा परदेशी हिच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, तिने सिनेमात अफजल खानाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये तिच्या मृत्यूचा सीन आहे… सीन शूट करण्यासाठी दिशा हिला खोल पाण्यात फेकलं जातं आणि अंडरवॉटर डुबण्याची ट्रेनींग देखील दिली जाते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करत सीनचा किस्सा सांगितला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत दिशा म्हणाली, ‘‘राजा शिवाजी’ मधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं, माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. अफजल बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना खूप काही शिकायला मिळालं.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘या संपूर्ण वॉटर सिक्वेन्ससाठी रितेश सरांनी आम्हा सगळ्यांना आधीपासूनच उत्तम ट्रेनिंग दिलं. पाण्याखाली अभिनय करणं, तासन्तास श्वासावर नियंत्रण ठेवणं, आणि प्रत्येक शॉटची अचूक तयारी—हे सगळं इतकं बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं की, आम्हाला सेटवर पूर्णपणे सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटत होता. सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतल्यामुळे हा कठीण सीनही खूप सहज झाला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.’, असं देखील अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या 10 वर्षांपासून रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ सिनेमा करण्याचा प्रयत्न करत होता. पण तीन वेळा अभिनेत्याला अपयश आलं. पण अखेर 1 मे रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमाने मोठी कमाई देखील केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून..
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून...
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी.
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?.
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन.