AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji: वाटलेलं काय सिनेमा केला असेल.. ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहिल्यावर अभिनेत्रीचा Video Viral

Raja Shivaji: नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने राजा शिवाजी हा सिनेमा पाहिला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाविषयी सांगितले आहे. आता ही अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

Raja Shivaji: वाटलेलं काय सिनेमा केला असेल.. 'राजा शिवाजी' सिनेमा पाहिल्यावर अभिनेत्रीचा Video Viral
राजा शिवाजीImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 12:49 PM
Share

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे ‘राजा शिवाजी.’ बॉलिवूडमधील लोकप्रिय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच तो चर्चेत होता. आता महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्याचे समोर आले आहे. आता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ‘राजा शिवाजी ‘ चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

दिपाली सय्यद यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिपाली सय्यद यांनी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या की, “महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कालच राजा शिवाजी चित्रपट पाहून आले. प्रीमियर होता काल. मला तुम्हाला शेअर करायचं आहे. माझ्या मनातलं सांगायचंय . चित्रपट बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते की काय अप्रतिम सिनेमा बनवला आहे. रितेश विलासराव देशमुख उर्फ भाऊ यांचं काय कौतुक करू. आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की काय सिनेमा बनवला असेल. खूप लोकांनी ट्रोल पण केलं त्यांना. ते बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की खरंच एवढं ट्रोल करण्यासारखं काही केलंय का त्यांनी. पण चित्रपट पाहिला आणि प्रत्येक भूमिका ज्या पद्धतीने निभावली आहे मग ती शिवरायांचे असू दे, जिजाऊंची असू देत सई मातांचा असू देत. अफजलखानांचा असू दे. आणि स्वतः शिवाजी महाराजांचा रोल, जो रितेशजींनी केलाय तो. इतका अप्रतिम केलाय.”

पुढे दिपाली सय्यद म्हणाली की, “हा चित्रपट बनवण्याच्या मागे महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, ज्या महाराष्ट्रात आपण नाक वर करून चालतो ते फक्त महाराजांमुळेच. अशा महाराजांवरती चित्रपट बनवला गेलाय . आणि माझं त्यामुळे चित्रपट बनवणाऱ्याचं काळीजही तसंच लागणार होतं. मला खरंच कौतुक आहे रितेशजींचं. इतका सुंदर चित्रपट बनवलाय . प्रत्येकानं घराच्या बाहेर निघून हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. सगळ्यांना विनंती करेन एकाही व्यक्तीने हा चित्रपट बघणं सोडू नये. चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा.”

‘राजा शिवाजी’ चित्रपटाविषयी

रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारच्या 90 च्या दशकातील कलाकारांनी सिनेमाला चार चाँद लावले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 11.35 कोटींची कमाई केली आहे.

Follow Us
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.