AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमातील ‘या’ सीनवर फिरवली कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दरम्यान सिनेमातील महत्त्वाचा सीन कट करण्यात आला, ज्यावर रितेश याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे 'राजा शिवाजी' सिनेमातील 'या' सीनवर फिरवली  कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर
| Updated on: May 12, 2026 | 12:33 PM
Share

Ritesh Deshmukh Interview: अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची गर्जना सध्या सर्वत्र ऐकू येत आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक जण या सिनेमाची तुलना, सिनेमाशी करत आहे… पण सिनेमातील सर्वात जास्त रडवणारा जो सीन आहे, त्या सीनमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यामुळे मोठे बदल करण्यात आले आहेत. टीव्ही 9 हिंदी डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत रितेश याने त्या सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यावर अभिषेक याच्यामुळे कात्री फिरवण्यात आली.

सिनेमात अभिषेक याने महाराजांचे भाऊ संभाजी भोसले यांची भूमिका साकाकली आहे. सिनेमात हाय पॉइंट तेव्हा येतो, जेव्हा महाराजांच्या भावाच्या मृत्यूची बातमी समोर येते… रितेश म्हणाला, ‘हा सीन शूट करणं आणि त्यावर अभिनय करणं फार कठीण होतं… कारण या सीनमध्ये महाराजांनी घरी परतून माँसाहेब जिजाऊ यांना सांगायचं होतं की, त्यांचा मुलगा आता या जगात नाही…

रितेश देशमुख म्हणाला, ‘सुरुवातीला मी सीन एडिट केला, ज्यामध्ये डायलॉग होते, जसं की, महाराजांना पाहिल्यानंतर माँसाहेबांना कळतं की, कोणाला तरी वीरमरण आलं आहे… यावर माँसाहेब विचारतात, ‘आबासाहेब…’ आणि महाराज म्हणतात नाही, पुन्हा माँसाहेब विचारतात, शंभू? आणि महाराजांकडून उत्तर येतं… हो…’

अभिषेक बच्चन काय म्हणाला?

रितेश याने जेव्हा हा सीन अभिषेक याला दाखवला, तेव्हा अभिषेक याने रितेश याला एक सल्ला दिला… अभिषेक म्हणाला, ‘रितेश ज्याठिकाणी तू ‘हो’ बोलत आहेस, तो एक शब्द कट कर… तेव्हा त्यांच्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द देखील नसतील…’, अशात अभिषेक याने दिलेल्या सल्ल्यानंतर रितेश याने ‘हो’ हा एक शब्द हटवला.

रितेश पुढे म्हणतो, ‘सिनेमात अभिषेक याचं फार मोठं योगदान आहे..’ अभिषेक याचे शब्द रितेशच्या काळजाला भिडले आणि त्याने ती एक ओळ वगळली. आता, सिनेमात महाराज बोलत नाहीत; त्यांचं मौन आणि त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना खूप काही सांगून जातात.’कधी – कधी भावनेच्या भरात आपण जास्त बोलून जातो. पण त्या सीनमध्ये मौनाची जी शक्ती होती, ती शक्ती फक्त अभिषेक याला ओळखता आली…’ असं देखील रितेश म्हणाला.

अभिषेक याने का दिला असा सल्ला?

अभिषेक बच्चन मुलखतीत म्हणाला, ‘एखाद्या कलाकारासाठी सर्वात कठीण काम स्वतःवर नियंत्रण मिळवणं असतं.’, रितेश याचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘सहसा एखाद्या कलाकाराला जेव्हा इमोशनल सीन करण्याची संधी मिळते, तेव्हा तो विचार करतो की, मी खूप रडेल, ओरडेल आणि सीन पूर्ण करेल. पण रितेश याने त्याठिकाणी स्वतःला थांबवलं. एक हिरो तोच असतो, ज्या रडायचं तर असतं, पण तो स्वतः अश्रू गिळून घेतो. त्याच वेदना दर्शकांपर्यंत अधिक पोहोचतात.’ असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

Follow Us
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली