Rakhi Sawant | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली ‘ड्रामा क्वीन’, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात…  

Rakhi Sawant | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली ‘ड्रामा क्वीन’, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात...  
राखी सावंत

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. राखीला नेहमीच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची इच्छा असते. त्यासाठी ती सतत काहीना काही करत असते.

Harshada Bhirvandekar

| Edited By: Rohit Dhamnaskar

Apr 09, 2021 | 7:00 AM

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. राखीला नेहमीच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची इच्छा असते. त्यासाठी ती सतत काहीना काही करत असते. ‘बिग बॉस 14’ नंतर आता राखी अधिकच चर्चेत आली आहे. याशिवाय राखी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. ती पोस्ट करत असलेले सगळेच व्हिडीओ नेहमी चर्चेत येत असतात. आता नुकताच राखीने ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा (priyanka chopra) अवतार धारण करत व्हिडीओ शेअर केला आहे (Rakhi Sawant transform herself as priyanka chopra share funny video on social media).

प्रियंकाच्या स्टाईलमध्ये अशी दिसली राखी!

राखीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रासारख्या अदा दाखवत आहे. तिच्या या व्हिडीओसाठी राखीने फेस अॅपचा वापर केला आहे. या अॅपच्या माध्यमातून तिने स्वत:ला प्रियंका चोप्रा म्हणून रुपांतरीत केले आहे.

चाहत्यांना आवडला व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये प्रियंकाच्या काही गाण्यांमध्ये राखीने तिचा चेहरा बदलून त्या जागी स्वतःचा चेहरा लावला आहे. अशा परिस्थितीत राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये खूपच पसंत केला जात आहे. राखीला या रूपात पाहून लोक खूप हसत आहेत. त्याचवेळी काही वापरकर्त्यांनी राखीला ट्रोल करणे देखील सुरू केले आहे.

या व्हिडिओवर राखीच्या चाहत्यांनी बर्‍याच कमेंट्स हार्ट इमोजीद्वारे केल्या आहेत. त्याचवेळी काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, या व्हिडीओत राखी खूपच वाईट दिसत आहे. तर, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की राखीनेही अशीच एक फिगर बनवावी.

यापूर्वीही राखीने बनवले व्हिडीओ

राखीने यापूर्वी श्रीदेवीच्या ‘नागीन’ गाण्यातील ‘मैं तेरी दुश्मन’, ‘तेरे नैना’ मधील काजोल आणि ‘गेंदा फूल’ मधील जॅकलिन फर्नांडिजच्या जागी फेस अॅप करत स्वतःचा चेहरा वापरला होता. वापरकर्त्यांनी आणि चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत(Rakhi Sawant transform herself as priyanka chopra share funny video on social media).

पुन्हा लग्न करण्यासाठी राखी तयार!

‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते. आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात राखी अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.

आधी म्हणाली संबंध संपले!

या आधी राखी सावंतने ‘बिग बॉस 14’मध्ये म्हटले होते की, ती तिने पती रितेशबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत. परंतु, आता राखीने नेहमीप्रमाणे तिचा शब्द फिरवला आहे. आता राखीने ईटाइम्सशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. राखी म्हणाली की, ती सध्या रितेशच्या संपर्कात आहे आणि ते दोघे व्हिडीओ कॉलवरही बोलतात. अभिनेत्री पुढे म्हणाली की, रितेशने आता आमच्या लग्नाबद्दल सर्वांसमोर बोलण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता राखी पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे.

(Rakhi Sawant transform herself as priyanka chopra share funny video on social media)

हेही वाचा :

Video | कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गोविंदाने भन्नाट स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ…

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें