लग्नातील मोठा ड्राम, लघवीसाठी मला कटोरा दिला आणि…, कसं झालं अभिनेत्याचं लग्न?
Randeep Hooda: रणदीप हुड्डा याच्या लग्नातील मोठा ड्रामा, लग्नात आलेल्या लोकांनी छत्री आणि कटोरा दिल्यानंतर... अभिनेता म्हणाला, 'लघवीसाठी मला कटोरा दिला आणि...', कसं झालं अभिनेत्याचं लग्न

अभिनेता रणदीप हुड्डा आणि गर्लफ्रेंड लिन लैशराम यांनी परंपरिक पद्धतील 2023 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मणिपूर येथे दोघांनीही मैतेई समाजाच्या रितीरिवाजानुसार लग्न केलं. एका मुलाखतीत रणदीप याने लग्नात काय काय झालं होतं सर्वकाही सांगितलं. अभिनेत्याच्या लग्नाच्या वेळी मणिपूर येथे वादग्रस्त वातावरण होतं. आसाम रायफल्समध्ये तैनात असलेल्या एका मित्राने लग्नाच्या तयारीत मदत केली.
रणदीप म्हणाला लग्नातील विधी अत्यंत पारंपरिक होत्या. अभिनेत्याला पघडी घाल्यात आली होती. ज्यामध्ये त्याला डोकं देखील हलवता येत नव्हतं. नाकात खास येत असेल तर, हेल्पर नाक खाजवण्यासाठी होता. ‘लग्नातील आलेल्या लोकांनी मला एक कटोरा आणि छत्री दिली होती. एका जागी मला बसवलं होतं. प्रत्येक जण येवून मला बघत होते.’
‘लग्न मंडपात पोहोचल्यानंतर तुम्ही हलू देखील शकत नव्हते. तुम्हाला चारही बाजूने चादर लपटलेली होती. मी आरामात बसलो तरी हेल्पर यायचा आणि म्हणायचा तुम्ही आज देव आहात आणि तुम्हाला हलता येणार नाही. चांगलं दिसणं गरजेचं आहे.’
‘जवळपास 2 तास मी एकाच जागी ताठ बसलेलो. त्यानंतर मला दिलेल्या कटोऱ्याबद्दल मी हेल्परला विचारलं. तेव्हा हेल्परने सांगितलं, लघवी झाली तर, दिलेली छत्री खोला आणि कटोऱ्यात लघवी करा. आजच्या दिवस तुम्ही देव आहात जागेवरुन हलू शकत नाही.’
सप्तपदी होताच AK-47 चा आवाज
रणदीप आणि लिन लॅशराम यांनी सप्तपदी घेतल्यानंतर बाहेरून AK – 47 चा आवाज येवू लागला. अभिनेत्याने सांगितलं की, पत्नी लॅशराम हिला लग्नात हसण्यासाठी मना करण्यात आलं होतं. लॅशराम साधी स्माईल देखील करु शकत नव्हती. असं देखील अभिनेता म्हणाला.
कोण आहे रणदीपची पत्नी लॅशराम?
लिन प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती एक बिझनेस वुमनही आहे. या मल्टिटॅलेंटेड अभिनेत्रीने सिनेमा क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. लिनने अनेक बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. प्रियंका चोपडासह करिना कपूरपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींसोबत तिने काम केलं आहे. सोशल मीडियावर तिचे 93 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.
