AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समाजातील सर्वात वाईट लोकं’; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता समय रैना अन् रणवीर भडकला

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. दोघांविरुद्ध अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्यावर टीका केली आहे. आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्याने यां दोघांवरही संताप व्यक्त करत ही समाजातील वाईट लोकं आहेत असं म्हणत राग व्यक्त केला आहे.

'समाजातील सर्वात वाईट लोकं'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता समय रैना अन् रणवीर भडकला
| Updated on: Feb 13, 2025 | 7:01 PM
Share

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमधील वाद अजून वाढतच चालला आहे. समय आणि रणवीरवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना पोलीश चौकशीसाठीही बोलवण्यात आले आहेत. सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्याचा रणवीरवर संताप 

या शोमध्ये रणवीरने पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे हा वाद पेटला. रणवीरने त्याबद्दल सर्वांची माफीही मागितली मात्र त्यानंतरही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून एका अभिनेत्याने रणवीरला चांगलंच सुनावलं आहे. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, फक्त सॉरी म्हणून हे चालणार नाही. असं म्हणत या अभिनेत्याने रणवीरला फटकारलं आहे.

“घाणेरडेपणाचे स्वातंत्र्य….”

शेखर सुमन यांनी या कलाकारांवर टीका केली आहे. टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी म्हटंलं आहे की, “हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, घाणेरडेपणाचे स्वातंत्र्य आहे, यामागील लोकांना सावध केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे. फक्त सॉरी म्हणून तुम्ही सुटू शकत नाही.”

“हे समाजातील सर्वात वाईट लोक आहेत”

शेखर सुमन पुढे म्हणाले, “हे समाजातील सर्वात वाईट लोक आहेत, जे आपल्या देशाच्या नैतिक रचनेचा नाश करत आहेत. त्यांना वाटते की ते खूप छान आहेत, पण ते काहीसे विकृत आणि बुद्धिहीन मूर्खांसारखेच आहेत. जर तुम्ही त्याला शो म्हणत असाल तर ते ताबडतोब बॅन केलं पाहिजे” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman)

दरम्यान हे प्रकरण वाढू लागल्याने समय रैनाने त्याच्या या शोचे सर्व एपिसोड म्हणजे सर्व व्हिडीओ हे डिलीट करून टाकले आहे. याचा अर्थ हा शो एकप्रकारे बंद केल्यासारखंच आहे.

गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर आहेत. समय रैनाचे घर पुण्यातील बालेवाडी येथे आहे. अशा परिस्थितीत, आसाम पोलीस पुण्यातील त्याच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी नोटीस लावण्यात येऊन त्याला चार दिवसांत हजर राहण्यास सांगितलं जाईल असंही म्हटलं जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.