AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha: नवऱ्याने स्वतःचा जीव संपवल्यानंतर अशी होती रेखा यांची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाल्या…

Rekha Love Life: प्रेमात अपयश मिळाल्यानंतर रेखा यांच्या नवऱ्याने देखील संपवलं स्वतःचं आयुष्य, मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर कशी होती रेखा यांनी अवस्था? रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

Rekha: नवऱ्याने स्वतःचा जीव संपवल्यानंतर अशी होती रेखा यांची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाल्या...
| Updated on: Sep 30, 2024 | 1:26 PM
Share

बॉलिवूडच्या एव्हग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्या ओळखची गरज नाही. रेथा जेवढ्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या, तेवढ्या त्यांच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली. रेखा प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढल्या. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. रेखा यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख म्हणजे जेव्हा त्यांच्या पतीने लग्नाच्या सात महिन्यांनंतर स्वतःला संपवलं. मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर रेखा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

एका मुलाखतीत खुद्द रेखा यांनी पतीच्या निधनानंतर समोर आलेल्या परिस्थितीचा खुलासा केला. पतीच्या निधनानंतर रेखा पूर्णपणे कोलमडल्या होत्या. रेखा यांनी सांगितल्यानुसार, मुकेश अग्रवाल आणि रेखा यांचं अरेंज मॅरेज होतं. रेखा म्हणाल्या होत्या, ‘मुकेश यांच्यासोबत लग्न करणं एक अव्हान होतं. पण आयुष्य एक अव्हान आहे. म्हणून माझं नशीब समजत मी त्यांच्यासोबत लग्न केलं.’

‘आमच्यामध्ये प्रेम नव्हतं. पण त्यांच्या निधनानंतर मला मोठा धक्का बसला. कारण त्यांच्या मृत्यूचा स्वीकार करणं माझ्यासाठी फार कठीण होतं. या दुःखातून बाहेर येणं माझ्यासाठी फार कठीण होतं. पण मी सत्य माझ्या मनात दाबून ठेवलं आणि परिस्थितीचा स्वीकार केला. कारण आपल्या हातात काहीही नसतं…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

सांगायचं झालं तर, मुकेश अग्रवाल यांच्या निधनानंतर रेखा यांनी कधीच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. पण रेखा यांच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर रेखा यांनी नात्याची कबुली देखील दिली होती.

आजही रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही. अमिताभ बच्चन शिवाय, विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली.

रेखा यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्या आहेत. रेखा आज बॉलिवूडपासून देखील दूर असल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा